Alia Bhatt  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्ट दुसऱ्यांदा होणार आई? 'कान्स'मधील 'त्या' Videoची चर्चा

Alia Bhatt 2nd Pregnancy : आलिया भट्टच्या 'कान्स' लूकची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. तिच्या या 'कान्स'मधील लूकमुळे ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt ) 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये (Cannes Film Festival 2025) दमदार एन्ट्री घेतली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'कान्स'मधील आलियाच्या हटके लूकमुळे तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी 'कान्स' मधील आलियाचा दुसरा लूक पाहून आलिया गरोदर असल्याचे बोले जात आहे. आलियाने तिच्या 'कान्स'मधील लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आलिया भट्टने 'कान्स'मध्ये दुसऱ्या लूकसाठी नेव्ही ब्लू रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला. त्यावर निळ्या रंगाचे डायमंड पाहायला मिळाले. आलियाच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ड्रेसवरील चमकत्या स्टोन्समुळे आलियाचा लूक खुलला आहे. या ड्रेसमध्ये आलिया पोज देत होती. त्यावरून सर्वत्र ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आलियाच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचा छोटा बेबी बंप दिसत आहे. आता आलिया-रणबीर पुन्हा आई-बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरवर रंगली आहे.

आलिया आणि रणबीरनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण चाहते आलिया-रणबीरसाठी खूप आनंदी आहेत. तसेच आलियाच्या दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी उत्सुक आहेत. आलियाच्या 'कान्स'मधील दुसऱ्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी तिच्या या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे.

आलिया आणि रणबीरचा लवकरच नवीन चित्रपट 'लव्ह अँड वॉर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबत बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल देखील पाहायला मिळणार आहे. सध्या हे तिघं देखील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 'लव्ह अँड वॉर' चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

SCROLL FOR NEXT