Richa chaddha And Ali Fazal Shared First Glimpse Of Daughter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa And Ali Daughter Pic : रिचा चड्ढा आणि अली फजलने दाखवली लेकीची पहिली झलक, शेअर केली भावनिक पोस्ट

Richa-Ali Shared First Glimpse Of Daughter : रिचा चड्ढा आणि अली फजल आई- बाबा झाले असून त्यांनी लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवली आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांनी १६ जुलै रोजी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ते दोघेही आई- बाबा झाले आहेत. चिमुकल्या परीचं आगमन झाल्यामुळे चड्ढा आणि फजल कुटुंबीय आनंदीत आहेत. रिचा आणि अलीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना लेकीची पहिली झलक दाखवली आहे.

रिचा आणि अलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मुलीच्या पायाचा फोटो शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोला दोघांनीही कॅप्शन दिले की, "आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं Collab करत एक पोस्ट शेअर करत आहोत. आम्ही खूपच धन्य झालो आहोत. आमची गोंडस परी आम्हाला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यस्त ठेवत आहे.. आमच्या लेकीला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मन:पुर्वक आभार आहेत."

रिचा आणि अलीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. यामध्ये तापसी पन्नु, प्रियंका चोप्रा, अर्चना पुरण सिंह, जिम्मी शेरगिल, नील मुकेश, नीती मोहन, स्वरा भास्कर, नेहा भसीनसह अनेक सेलिब्रिटींनी रिचा आणि अलीवर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे.

'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर २०१२ मध्ये दोघांचीही भेट झाली होती. तेव्हा त्यांची फ्रेंडशिप झाली होती. पण त्या फ्रेंडशिपचे रुपांतर नंतर रिलेशनशिपमध्ये झाले. दरम्यान, अली फजलच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या काही दिवसांपासून अली फजल 'मिर्झापूर ३'मुळे चर्चेत आहे. तर रिचा चड्ढा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' सीरीजमुळे चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT