Akshay Kumar withdraws from Vimal tobacco Gutkha advertisement, Akshay Kumar Latest News  Instagram/ @akshaykumar
मनोरंजन बातम्या

गुटख्याच्या जाहिरातीतून अक्षय कुमारची माघार; फॅन्सच्या नाराजीनंतर मागितली माफी

Akshay Kumar withdraws from Vimal tobacco Gutkha advertisement: १६ एप्रिलला ही जाहिरात प्रदर्शित झाली होती, ज्यात किंग शाहरुख खान आणि अजय देवगण हे देखील दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं अखेर तंबाखूच्या जाहिरातीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. विमल (Vimal) या गुटख्याच्या (Vimal tobacco Gutkha) जाहिरातीत अक्षय कुमार झळकला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. फिटनेस आयकॉन आणि तंबाखू, व्यसनमुक्तीच्या जाहिराती करणारा अक्षय (AKshay Kumar) जेव्हा चक्क् गुटख्याच्या जाहिरातीत दिसला तेव्हा त्याच्या चाहत्यांनीही सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली. १६ एप्रिलला ही जाहिरात प्रदर्शित झाली होती, ज्यात किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) हे देखील दिसत आहेत. (Akshay Kumar apologises for endorsing tobacco brand after backlash, seeks fans' love and wishes forever)

हे देखील पाहा -

विमल ईलायचीच्या जाहिरातीत तुम्ही बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला पाहिलं असेल. या जाहिरातीत शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत खिलाडी कुमार बादशाह दिसला होता. शाहरुख आणि अजय देवगणचे काहीही बिघडले नाही, परंतु अक्षय कुमार या कृत्यामुळे सोशल मीडियावर तो वाईटरित्या ट्रोल झाला. लोकांनी ट्रोल केल्यानंतर आता अक्षय कुमारने विमल ईलायचीच्या जाहिरातीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. (Akshay Kumar Latest News)

अक्षयने मागितली चाहत्यांची माफी

आपल्या चाहत्यांची माफी मागून अक्षय कुमारने या जाहिरातीतून माघार घेतली आहे. त्याने जाहीर केले की तो यापुढे तांबाखू ब्रँड (विमल) ब्रँडता अॅम्बेसेडर राहणार नाही. अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. खिलाडी कुमारने इंस्टा पोस्टमध्ये लिहिले की, मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूचं कधीही समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही. मी तुमच्या भावनांचा मी आदर करतो. म्हणूनच मी नम्रतेने यातून माघार घेत आहे.

अक्षय कुमारची पोस्ट

अक्षय कुमारने इंस्टा पोस्टमध्ये लिहिले की, "मी ठरवले आहे की जाहिरातीसाठी मिळालेले पैसे मी चांगल्या कामासाठी वापरेन. ब्रँड, त्याची इच्छा असल्यास, या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसारित करणे सुरू ठेवू शकते. पण मी वचन देतो की भविष्यात मी हुशारीने आणि जबाबदारीने काम निवडेन. त्या बदल्यात मी नेहमीच तुमचे प्रेम आणि प्रार्थना मागत राहीन.

अक्षय कुमार झाला ट्रोल

अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी रिलीज झाली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि अजय देवगणने 'विमल युनिव्हर्स'मध्ये अक्षय कुमारचे स्वागत केले. बॉलिवूडचे तीनही मोठे स्टार्स शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार हे पहिल्यांदाच एका जाहिरातीत दिसले. ही मोठी गोष्ट असली तरी तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी तिघांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे ही जाहिरात ट्रोल्सच्या निशाण्याखाली आली. अजय देवगण यापूर्वीही अनेक तंबाखू ब्रँडच्या एड्समध्ये दिसला आहे.

पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी

शाहरुख खान यानेही अशा जाहिराती केल्या. तेव्हा असा गदारोळ झाला नाही. मात्र खिलाडी कुमार दिसताच लोकांनी एकच गोंधळ घातला. अक्षय कुमारच्या चाहत्यांनी अक्षयचे जुने व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. ज्यात तो मद्य, सिगारेट यांसारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे दिसले. तीन वेळा पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या खिलाडी कुमारला अनेकांनी पुरस्कार परत करण्यास सांगितले. मात्र अनेक टीकांचा सामना केल्यानंतर अक्षयने माफी मागितली आहे. आता चाहते त्याला माफ करणार का आणि हे ट्रोल्स थांबणार का हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT