Akshay Kumar-Tiger Shroff Dance Video Instagram @tigerjackieshroff
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar-Tiger Shroff Dance: चक्क अक्षय कुमारला पडली रीलची भुरळ, टायगर श्रॉफसह रिक्रिएट केले 'हे' गाणे

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने 'मैं खिलाडी' या गाण्यावर टायगरसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Akshay Kumar-Tiger Shroff Instagram Reel: बॉलिवूडचे दोन सर्वात मोठे अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ लवकरच एके चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. अली अब्बास जफरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दोघे एकत्र काम करणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. चित्रपटाचा टीझर पाहून हे लक्षात येत आहे की, चाहत्यांना या चित्रपटामध्ये बरीच अॅक्शन पाहायला मिळणार आहे. अक्षय आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज मुख्य भूमिका साकारणार आहेत.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसात त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'सेल्फी' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मैं खिलाडी' या गाण्यावर टायगरसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर टायगर श्रॉफसोबत त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'सेल्फी'मधील 'मैं खिलाडी' या गाण्यावर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे गाणे 'मैं खिलाडी तू अनारी' या लोकप्रिय जुन्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. मूळ व्हिडिओमध्ये अक्षय आणि इमरान हाश्मी पाहिल्यानंतर, अक्षय कुमार आणि टायगरला एकत्र डान्स करताना पाहणे खरोखरच एक ट्रीट आहे.

या डान्स व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि टायगर यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. ब्लॅक लूकमध्ये दोघेही डॅशिंग दिसत आहेत. तसेच दोघांनी अप्रतिम डान्स केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप पाहून चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

'सेल्फी'चे चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले असून करण जोहर आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट पृथ्वीराज यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स या चित्रपटाचा रिमेक आहे. डायना पेंटी आणि नुसरत भरुच्चा यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

Custard Apple : सिताफळ खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT