Akshay Kumar News Saam tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar News : "लक्षात ठेव, इथे काही लोक असे आहेत, जे...", वर्षाला ४-४ चित्रपट करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर

Akshay Kumar Interview : सलग ८ फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेता अक्षय कुमाराचं सध्या कौतुक होत आहे. आपण खिलाडी कुमार का आहोत? हे त्याने आपल्या एका वक्तव्यातून दाखवून दिल आहे. नेमके काय बोला अक्षय जाणून घ्या

Shweta Joshi

ॲक्शनमॅन अक्षय कुमारची जादू फिकी पडली का? असा प्रश्न सध्या बॉलिवूडमध्ये विचारला जातोय. कारण गेल्या काही वर्षांपासून त्याचे सलग ६ ते ७ चित्रपट फ्लॉप गेलेत. नुकताच रिलीज झालेला 'सरफिरा' चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरला आहे. गेल्या काही वर्षभरात अक्षयचा आठवा चित्रपट फ्लॉप ठरलाय. यात 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षाबंधन', 'कठपुतली', 'राम सेतु', 'सेल्फी', 'मिशन राणीगंज', 'बड़े मियां छोटे मियां' हे चित्रपट फ्लॉप लिस्टमध्ये आहेत.

अक्षय कुमार फ्लॉप चित्रपट देऊनही थांबला नाही. वर्षाला अनेक चित्रपट करण्यामुळे कायम अक्षय ट्रोल होतो. एका इंटरव्ह्यूमध्ये अक्षयने ट्रोलर्सला परखड उत्तर दिलं आहे. अक्षय कुमार म्हणाला, " मला म्हणतात वर्षाला ४ चित्रपट का करतो, याला तर एक चित्रपट करायला हवा.. चला मग एक चित्रपट करतो, मग बाकी दिवसांमध्ये काय करु? तुझ्या घरी येऊ? बेटा, लक्षात ठेव, ज्यांना कामं मिळतात ते भाग्यवान असतात. नाही तर रोज कुणीना कुणी बोलत असतं. बेरोजगारी सुरु आहे, हे सुरु आहे, ते सुरु आहे. ज्यांना कामं मिळतात त्यांना करु द्या"

एक काळ होता जेव्हा फक्त अक्षयच्या नावावर चित्रपट चालायचे. नुसते चालायचेच नाही तर सुपरहिट व्हायचे. त्याच्या चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर दिर्घकाळ परिणाम जाणवतो. 'हेराफेरी', 'फिर हेरा फेरी', 'वेलकम', 'भागम् भाग' 'भुलभुलैया' असे काही सुपर हिट कॉमेडी चित्रपट, ज्याची आठवण जरी आली ही हसू आवरत नाही.

तर 'धडकन', 'अजनबी' सारख्या चित्रपटांत अक्षयने उत्कृष्टपणे नकारात्मक भूमिका साकारली. तर 'राऊडी राठोड', 'हाऊसफुल २', 'खिलाडी ७८६' असे काही १०० करोडच्या क्लबमध्ये सामील झालेले अक्षयचे काही चित्रपट आहेत. 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'पॅडमॅन', 'गोल्ड' अशा चित्रपटांसाठी अक्षयने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

सलग फ्लॉप चित्रपटांनंतर आता अक्षयला एका सुपरहिट चित्रपटाची अत्यंत गरज आहे. जेणेकरून त्याचे करिअर पुन्हा मार्गावर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT