Sky Force Vs Deva Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sky Force Vs Deva Box Office Collection: 'स्काय फोर्स' की 'देवा' बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? कोणी जमावला कितीचा गल्ला?

Sky Force Vs Deva : सध्या बॉक्स ऑफिसवर 'स्काय फोर्स' आणि 'देवा' चित्रपटाची टक्कर पाहायला मिळत आहे. कलेक्शनमध्ये कोणत्या चित्रपटाने बाजी मारली, जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट धुमाकूळ घालत आहे. एक अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' (Sky Force ) आणि दुसरा शाहिद कपूरचा 'देवा' (Deva ) चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देत आहेत. यांचे आजपर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'देवा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'देवा' चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'देवा' चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरचा देवा' चित्रपट 85 कोटी बजेटमध्ये बनला आहे. 'देवा' चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'देवा' चित्रपट ॲक्शन-थ्रिलर आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'देवा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.4 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.25 कोटी, चौथ्या दिवशी 2.75 कोटी, पाचव्या दिवशी 2.4 कोटी आणि सहाव्या दिवशी 2.35 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाने रिलीजच्या 7 व्या दिवशी 1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आता पर्यंत देवा चित्रपटाने सात दिवसांत 28.15 कोटींचा गल्ला जमावला आहे. 'देवा' चित्रपटात शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

'स्काय फोर्स' बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'स्काय फोर्स' चित्रपटाने मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या आठवड्यात भारतात 99.7 कोटी रुपयांची कमाई केली. 8व्या दिवशी 4.6 कोटी, 9व्या दिवशी 7.4 कोटी कमावले आहेत. 'स्काय फोर्स'ची 10 दिवसांची एकूण कमाई 119.5 कोटी रुपये होती. 11व्या दिवशी चित्रपटाने 1.6 कोटी कमावले. तर 12व्या दिवशी 1.35 कोटी रुपये आणि 13व्या दिवशी 1.5 कोटी रुपये कमावले आहेत.

'स्काय फोर्स' चित्रपटाने रिलीजच्या 14 व्या दिवशी 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने 124.95 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 160 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. 'स्काय फोर्स' चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात वीर पहारिया देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'स्काय फोर्स' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'देवा' च्या तुलनेत 'स्काय फोर्स'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'स्काय फोर्स'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT