Akshay Kumar Visits Badrinath Temple Instagram
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Visits Badrinath Temple: अक्षय लागला देवपुजेला; आधी केदारनाथ आता बद्रीनाथ, चाहत्यांना शेअर केला सुंदर व्हिडिओ

Akshay Kumar At Badrinath Temple: अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग निमित्त बद्रिनाथ मंदिरात जात असल्याची माहिती दिली.

Chetan Bodke

Akshay Kumar Shared Post Of Badrinath Temple: सध्या बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या आठवड्यातच अक्षय कुमारने केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. अक्षय शूटिंगदरम्यान अनेक धार्मिक स्थळांना भेट देत आहे, आजच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करच उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामला भेट देत असल्याची माहिती दिली.

अक्षयने गेल्या मंगळवारी उत्तराखंडमध्ये असतानाच त्याने केदारनाथ मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात दर्शन घेतले. अक्षयने काही वेळापुर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत बद्रीनाथ मंदिरात दर्शनाकरिता जात असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने, काळ्या रंगाचा हुडी आणि ट्रॅक पॅंट घालून दर्शनासाठी आला होता. यावेळी अक्षयने पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात दर्शन घेतले. मंदिरात दर्शनासाठी जाताना अक्षयच्या आजु- बाजुला त्याच्या चाहत्यांची खूपच गर्दी दिसून येत आहे.

अक्षयने रविवारी सकाळी हेलिकॉप्टर राईड करतानाचा देखील व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत अक्षयने कॅप्शन लिहिले की, “देवभूमी उत्तराखंडमध्ये चित्रपटाच्या शूटिंगचे सौभाग्य मला लाभले!! श्री बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी मी आता मार्गस्थ झालोय. अगदी अप्रतिम. शब्द अपुरे आहेत. जय बद्री विशाल.”

गेल्या काही आठवड्यांपासून उत्तराखंडमध्ये असलेल्या अक्षय कुमारने पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शनिवारी, अभिनेत्याचे उत्तराखंडमध्ये व्हॉलीबॉल खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अक्षय उत्तराखंड पोलिसांच्या सदस्यांसोबत खेळताना स्पॉट झाला होता. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट आणि स्नीकर्स घातले होते.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर अक्षय कुमारने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची सुद्धा भेट घेतली. यावेळी त्याने उत्तराखंड राज्यात नवीन फिल्म इंडस्ट्री हब बनवण्याबाबतच्या निर्णयावर संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत लवकरच ‘OMG- ओह माय गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर जाहीर झालेली नाही. याशिवाय त्याच्याकडे अली अब्बास जफरचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ देखील आहे, ज्यामध्ये तो टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT