Akshay Kumar Got Indian Citizenship instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Share Post: कॅनडियन नागरिकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांसाठी अक्षय कुमारची स्वातंत्र्यदिनी खास पोस्ट

Akshay Kumar Independence Day Post: अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.

Pooja Dange

Akshay Kumar gets Indian citizenship on Independence Day:

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'OMG 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने नुकतीच ५० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. या चित्रपटावर अनेक टीका झाल्या. अनेकांनी या चित्रपटावर आक्षेप देखील घेतला होता. सर्व वादविवादांना तोंड देत अखेर 'OMG 2' चित्रपट प्रदर्शित झाला.

'OMG 2' चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत. तर या वादग्रस्त चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटामध्ये किशोरवयीन मुलांना सेक्स एज्युकेशन का गरजेकजे आहे, हे सांगण्यात आले आहे.

OMG 2 चित्रपटामुळे अक्षय कुमार चर्चेत आहेच. पण आता तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमार कॅनेडियन नागरिक आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल केले जाते. परंतु आता या सगळ्या ट्रोलर्सची बोलती अक्षय कुमारने बंद केली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट करत त्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे जाहीर केले आहे. त्याने गृहमंत्रालयाचे एक लेटर शेअर केले आहे. त्यात त्याचे नागरिकत्व बदलल्याची सर्व माहिती आहे. तर ही पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, 'दिल ओर सिटिज़नशिप, दोनों हिंदुस्तानी. स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!'

अक्षय कुमारच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स कमेंट करू त्याचे अभिनंदन करत आहेत. तसेच अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना देखील सुनावत आहेत.

अक्षयच्या एका फॅन कमेंट केली आहे, हेटर्सकडे एक गोष्ट होती बोलायला, आता ती पण गेली' जय हिंद.' तर दुसऱ्या फॅन कमेंट केली आहे, भारतीय नागरिकत्व मिळाल्याबद्दल अभिनंदन अक्षय कुमार सर, तुमचे मन जन्मापासून भारतीय होते.' अशा अनेक कमेंट अक्षय कुमारचे फॅन्स त्याच्यासाठी करत आहेत.

अक्षय कुमारचा 'ओएमजी २' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तर चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार दिसणार आहे. त्याच्यासोबत टायगर श्रॉफ देखील दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे प्रकशित झाले होते. त्याचे डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT