Ram Setu Poster
Ram Setu Poster Twitter/ @Ramesh Bala
मनोरंजन बातम्या

Ram Setu Gets Protection: अक्षय कुमारच्या राम सेतूला मिळाले संरक्षण, दिल्ली उच्च न्यायालयात जिंकली लढाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. मात्र हळूहळू त्यांच्या अडचणी सुद्धा कमी होताना दिसत आहेत. काही अडचणींमुळे बॉलिवूडला दरवर्षी करोडोंचा तोटा सहन करावा लागतो. आजपर्यंत पायरसीला प्रोत्साहन देणाऱ्या वेबसाइटवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. पण आता राम सेतूच्या निर्मात्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

अक्षय कुमारचा चित्रपट राम सेतू प्रदर्शित होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने 23 वेबसाइटवर राम सेतूचे वितरण, स्ट्रीमिंग, डाउनलोड आणि होस्टिंग करण्यावर बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वेबसाइट्सची यादी तयार करण्यात आली आहे. या संकेतस्थळांवरून राम सेतू डाउनलोड करता येणार नाही.

राम सेतूच्या निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचे हक्क त्यांच्याकडे असल्याने परवानगीशिवाय इंटरनेट/मोबाइलसह इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून स्ट्रीमिंग, वितरण किंवा होस्टिंगद्वारे चित्रपट प्रसारित करणे कॉपीराइट नियमांचे उल्लंघन आहे. (Movie)

या प्रकरणी कोर्टाचे म्हणणे आहे की, निर्माते चित्रपट बनवण्यासाठी आणि प्रमोशन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात. अशा स्थितीत निर्मात्यांच्या परवानगीशिवाय वेबसाईट, मोबाईल किंवा अन्य माध्यमातून कोणत्याही प्रकारे चित्रपट प्रदर्शित होत असेल तर ते चुकीचे मानले जाईल. न्यायालयाने 'राम सेतू'साठी 23 वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे. (Aksahy Kumar)

अक्षय कुमारच्या चित्रपटात त्याच्याशिवाय जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'राम सेतू' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाला खूप फायदा होऊ शकतो. निर्मात्यांनाही चित्रपटाच्या बंपर ओपनिंगची पूर्ण अपेक्षा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Bollywood)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT