Akshay Kumar News, Bollywood News
Akshay Kumar News, Bollywood News  Akshay Kumar Instagram
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar News: अक्षयने 'या' चित्रपटांना नाकारले, आता होतोय पश्चाताप...

Chetan Bodke

Akshay Kumar: अक्षय कुमारचे २०२२ मध्ये अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. त्याचे सलग इतके चित्रपट फ्लॉप होणे म्हणजे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी बाब होती. अक्षय कुमारसाठी २०२२ हे वर्ष खरंच खूप खराब गेलं, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. अक्षयने त्याच्या फिल्मी करियरमध्ये काही चित्रपटांना नाकारले होते, पण तेच चित्रपट प्रदर्शनानंतर हिट ठरले होते. चला तर नजर टाकुया, अक्षयने कोणकोणत्या चित्रपटाला नकार दिला.

Race

1. रेस (Race)

चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले असून चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी अक्षय कुमारला पहिली पसंती होता. मात्र अक्षय कुमारने हा चित्रपट नाकारला.

Baazigar

2. बाजीगर (Baazigar)

बाजीगर हा चित्रपट शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास मस्तान होते. त्याने सर्वप्रथम सलमान खान आणि त्यानंतर अक्षय कुमारला ही ऑफर देण्यात आली होती, मात्र त्याने सुद्धा हा चित्रपट नाकारला होता.

Bhaag Milkha Bhaag

3. भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag)

'भाग मिल्खा भाग' चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाला बरीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला होता. अक्षय कुमारला या चित्रपटात मिल्खा सिंगच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने हा चित्रपट नाकारला होता.

The Rock

4. द रॉक (The Rock)

अक्षय कुमारने अनेक बॉलिवूड चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांचे प्रस्ताव नाकारले आहेत. खरंतर अक्षय कुमारला द रॉक चित्रपटाची ऑफर मिळाली होती. म्हणजेच अक्षय कुमारला डॉन जॉन्सनसोबत हॉलिवूडमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. जी त्याने चक्क नाकारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election: महाजन अचानक भुजबळांच्या भेटीला का आले? तर्क वितर्कांना उधाण, नाशकात काय घडतंय?

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचले राज ठाकरे यांच्या निवासस्थानी

Raj Thackeray Sabha: सभेआधी मोठी घडामोड! एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले, कारण काय?

Pune Crime : एकमेकांकडे बघण्यावरुन वाद? पुण्यात कोयत्याने वार करत तरुणाची हत्या

सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

SCROLL FOR NEXT