Mission Raniganj 2nd Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Mission Raniganj 2nd Day Collection: अक्षय आणि परिणीतीच्या ‘मिशन रानीगंज’ला विकेंडला संमिश्र प्रतिसाद; शनिवारी कमावले इतके कोटी...

Mission Raniganj Box Office Collection: प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने कमाईचा इतका खास आकडा गाठला नसून दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्या दुप्पट कमाई केली आहे.

Chetan Bodke

Mission Raniganj 2nd Day Box Office Collection

‘केसरी’नंतर अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा बहुचर्चित ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. परिणीतीसाठी हा चित्रपट खास असणार आहे, कारण तिचा लग्नानंतर हा पहिलाच चित्रपट असून तिचे फॅन्स या चित्रपटासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आतुर होते. पण जरीही असं असलं तरी सुद्धा चित्रपटाला प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने कमाईचा इतका खास आकडा गाठला नसून दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्या दुप्पट कमाई केली आहे.

सत्य घटनेवर आधारित, चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. प्रेक्षकांच्या भेटीला अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राची जोडी पहिल्यांदाच आलेली नाही, यापूर्वी ‘केसरी’मध्ये सुद्धा त्यांनी एकत्र काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातलं गाणं प्रदर्शित झालं, गाण्याला नेटकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देखील दिला होता. चित्रपट समीक्षकांनी ‘मिशन रानीगंज’चे कौतुक केले आहे. पण असलं तरीही प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला फारसा उत्तम प्रतिसाद दिलेला नाही. नुकताच चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, याचा आकडा समोर आला आहे.

सॅकनिल्क रिपोर्टनुसार, ‘मिशन रानीगंज’ ने पहिल्या दिवशी फक्त २.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी ४. ७० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण आतापर्यंत ७. ५० कोटींचा आकडा गाठला आहे. काही ट्रेड ॲनालिस्टच्या मते, हा चित्रपट येत्या विकेंडला चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची निर्मिती ५५ कोटींमध्ये झाली आहे.

चित्रपटाची कथा, नायक जसवंत गिल यांची आहे. नायक जसवंत गिलच्या भूमिकेत अक्षय कुमार असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत परिणीती चोप्रा आहे. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथील कोळसा खाणीत ६५ खाण कामगार अडकल्याच्या वास्तविक कथेवर हा चित्रपट आधारित आहे. त्या कोळसा खाणीत अडकलेल्या 65 खाण कामगारांचे प्राण जसवंत सिंग गिल यांनी वाचवले होते. त्या घटनेनंतर जसवंत सिंग गिल यांना सर्वत्र ‘कॅप्सूल गिल’ म्हणून ओळखू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT