Bhojpuri Actress Akanksha Dubey Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akanksha Dubey मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा! आत्महत्येआधी त्या 17 मिनिटांत नेमकं काय घडलं?

Akanksha Dubey Death Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

Chandrakant Jagtap

Bhojpuri Actress Akanksha Dubey Death: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला. दरम्यान या प्रकरणात पोलिस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन मोठे अपडेट दिले आहेत.

यातील पहिली अपडेट अशी की आकांक्षा दुबे मृत्यूच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती आणि या लाईव्हदरम्यान ती रडत होती. तर दुसरी माहिती आणखी धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या रात्री आकांक्षाचा मृत्यू झाला त्या रात्री तिला रात्री उशिरा सोडण्यासाठी एक जण हॉटेलमध्ये आला होता. तो तिच्या खोलीतही गेला होता. त्यानंतर तिच्या खेलीचा दरवाजा उघडलाच नाही. आता पोलीस आकांक्षाचे कॉल डिटेल्सच्या मदतीने मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

मृत्यूच्या काही तास आधी आली लाईव्ह

आकांक्षा दुबे मृत्यूच्या काही तास आधी इन्स्टाग्राम लाइव्ह आली होती. या लाईव्हदरम्यान ती भावूक झाली होती, तिच्या डोळ्यात अश्रू देखील होते. त्यामुळे तिला या लाईव्हमध्ये काही सांगायचे होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु आकांक्षाने संपूर्ण लाईव्हदरम्यान तिच्या अश्रूंचे कोणतेही कारण सांगितले नाही. (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये आकांक्षा उदास दिसत होती. तिच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्संनी तिला अनेक प्रश्न विचारले. तिच्या रडण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आकांक्षा त्यांच्या उत्तर देण्याऐवजी आकांक्षा आणखी जोरजोरात रडू लागली.

हॉटेलमध्ये आलेला तो तरुण कोण?

आकांक्षा दुबेचा रडतानाचा व्हिडिओ चाहत्यांनी रेकॉर्ड केला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकांक्षाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु मृत्यूपूर्वी तिला हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आलेल्या तरुणावर आता संशय व्यक्त केला जात आहे. हा तरुण आकांक्षाच्या खूप जवळ होता असेही सांगितले जात आहे.

आत्महत्येपूर्वी 17 मिनिटांत नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी रात्री आकांक्षा वाढदिवसाच्या पार्टीला जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडली. त्यानंतर रात्री २ वाजण्याच्या सुमारास एक तरुण तिला ड्रॉप करण्यासाठी हॉटेलमध्ये आला. हा तरुण तिला सोडण्यासाठी तिच्या खोलीपर्यंत गेला. तो आकांक्षासोबत तिच्या खोलीत सुमारे १७ मिनिटे थांबला. त्यानंतर तो खोलीच्या बाहेर पडला.

या प्रसंगानंतर आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा उघडलाच नाही. आता पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहे. या तरुणाला आकांक्षा दुबेच्या आत्महत्येमागचं खरं कारण माहित असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT