'दृश्यम ३' चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार
'दृश्यम ३'च्या ॲडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरुवात
अजय देवगण-तब्बूची जोडी थिएटर गाजवणार
अजय देवगणचा 'दृश्यम ३: द कन्क्लुजन' (Drishyam 3: The Conclusion) चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे, ज्यात चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस असलेल्या २ ऑक्टोबरसाठी सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३' ची ॲडव्हान्स बुकिंग कमाई तब्बल १८ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.चित्रपट भारतात पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांहून अधिक नेट कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रमुख बाजारपेठांमधून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'दृश्यम ३'चे प्रदर्शनाच्या पाच दिवस आधी आगाऊ बुकिंग सुरू झाले. तीन दिवसांत चित्रपटाने १८.४८ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
'ब्लॉक सीट्स' (राखीव जागा) वगळता हा आकडा १२.२१ कोटी रुपये इतका आहे. 'दृश्यम ३' चित्रपटाच्या २१,२८१ शोसाठी अंदाजे ४.७७ लाख तिकिटे विकली गेली आहेत. याची एकूण 'ऑक्युपन्सी' (प्रेक्षकांची उपस्थिती) सुमारे १० टक्के इतकी नोंदवली गेली आहे, तर 'ब्लॉक सीट्स' वगळता हे प्रमाण ६ टक्के आहे. आतापर्यंत २४ शो 'सोल्ड आऊट' (पूर्णपणे बुक) झाल्याचे वृत्त आहे.
'दृश्यम ३' च्या पहिल्या दिवसाच्या बुकिंगमधून ९.७२ कोटी रुपये जमा झाले आहेत, जे आतापर्यंतच्या एकूण 'ग्रॉस ॲडव्हान्स कलेक्शन'च्या सुमारे ५३ टक्के आहेत.हा चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित होत असल्याने अनेकांना सुट्टी असल्याने चित्रपटाला पहिल्याच दिवशी मोठा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रातून सुमारे ५.८७ कोटी रुपयांची कमाई झाली असून, एकूण 'ग्रॉस ॲडव्हान्स कलेक्शन'मध्ये राज्याचा वाटा सुमारे ३२ टक्के इतका आहे.मुंबईत ३.४५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे, तर पुण्यात सुमारे १.६१ कोटी रुपयांची नोंद झाली आहे.
अजय देवगणच्या 'दृश्यम'चा हा तिसरा भाग आहे. पहिले दोन भाग खूप गाजले. आता तिसरा भाग पुन्हा धुमाकूळ घालायला येत आहे. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.