Drishyam 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 2 Controversy: 'दृश्यम 2'च्या अडचणीत वाढ, निर्मात्यांना सहन करावे लागणार नुकसान

अजय देवगणचे थँक गॉड आणि दृश्यम २च्या अडचणीत वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Drishyam 2 Controversy: अजय देवगणचे 'थँक गॉड' आणि 'दृश्यम २' हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. परंतु थँक गॉड चित्रपटाला अनेक वादांना तोंड द्यावे लागत आहे. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता अजय देवगणच्या 'दृश्यम 2' साठी देखील समस्या निर्माण होते आहेत.

या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजित कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. याशिवाय चित्रपटात आणखी एक नवीन एंट्री झाली आहे. बंद झालेली केस पुन्हा एकदा उघडली जाईल असे या कथेत दाखवले जाणार आहे. केस पुन्हा ओपन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अक्षय खन्ना आपल्याला दिसणार आहे. दृश्यम आणि दृश्यम 2 हे त्याच नावाचे मुळ मल्याळम चित्रपट आहेत. ज्यांचे रिमेक अजयचे हिंदी चित्रपट आहेत. (Bollywood)

'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधी निर्माते मुळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून युट्युबवर प्रदर्शित करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही बातमी ऐकल्यानंतर अजय देवगणसह संपूर्ण टीम हादरणार आहे. मात्र या वृत्तावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जर या गोष्टी खऱ्या ठरल्या तर 'दृश्यम 2'च्या निर्मात्यांना खूप नुकसान सहन करावे लागू शकते. (YouTube)

Ajay Devgan Look in Upcoming Movie Thank God

दृश्यम 2 चा मल्याळम सिक्वेल अमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) आधीच उपलब्ध आहेत. अजयचा हा चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग निशिकांत कामत यांनी 2015 मध्ये केला होता. त्यानंतर 2020 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामुळे अभिषेक पाठक यांनी दृष्यम 2 ची कमान आपल्या हातात घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये पूर्ण झाले. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinch Sarbat Recipe : उन्हाळ्यात लिंबूपाणी कशाला? झटपट बनवा आंबट-गोड चिंचेचा सरबत, वाचा रेसिपी

Viral Video : मोठा राडा झाला! नवरा बाहेरगावी, बायको बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत; त्याचवेळी गावकरी धडकले? नेमकं काय घडलं?

IPL 2026 : ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा; चॅम्पियन खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Crime News: घरमालकाने दरवाजा ठोठावला; ओळखीचा म्हणून विद्यार्थिनीनं दरवाजा उघडला, पण नंतर जे घडलं त्यानं सर्वच हादरले

Maharashtra News Live Update: जळगाव नेहरू नगरातील सांदीपनी बॉईज हॉस्टेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT