HBD Ajay Devgn  SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Ajay Devgn : बॉलिवूडच्या 'सिंघम'चं टॉप ३ हिट अन् फ्लॉप चित्रपट, तुम्ही कोणता पाहिलात?

Ajay Devgn Top 3 Hit And Flop Movies : आज बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा वाढदिवस आहे. अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याचे टॉप तीन हिट आणि फ्लॉप चित्रपट जाणून घेऊयात. चित्रपटांची यादी आताच नोट करा.

Shreya Maskar

आज ( 2 एप्रिल ) बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणचा वाढदिवस आहे. अजय देवगण आज 56 वर्षांचा झाला आहे. बॉलिवूडमध्ये तो ॲक्शन किंग म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अजय देवगण बॉलिवूडचा 'सिंघम' आहे. अजयने 'फूल और कांटे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली.

अजय देवगणने चित्रपटांमध्ये सर्वात जास्त पोलिसाची भूमिका केल्या असून त्या खूप गाजल्या आहेत. अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आजवरच्या कारकि‍र्दीतील हिट आणि फ्लॉप चित्रपटांची यादी पाहू या.

अजय देवगणचे टॉप 3 हिट चित्रपट

सिंघम अगेन

2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अजय देवगणचा 'सिंघम अगेन' सुपरहिट झाला. या चित्रपटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. यात करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार पाहायला मिळाले. या चित्रपटात अजय देवगणने पोलिसाची भूमिका केली होती. हा चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित आहे.

तान्हाजी द अनसंग

2020 मध्ये अजय देवगणचा 'तान्हाजी द अनसंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा ऐतिहासिक सिनेमा आहे. हा चित्रपट सरदार तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. यात अजयने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. कोंढाणा किल्ला कसा जिंकला याचे कहाणी चित्रपटात पाहायला मिळत आहे.

दृश्यम 2

2022मध्ये अजय देवगणचा 'दृश्यम 2' सुपरहिट ठरला. या चित्रपटात शोध, तपास आणि कुटुंबाची काळजी पाहायला मिळाली. अजय देवगण आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना चित्रपटात दिसत आहे. चित्रपटात त्याने विजय साळगावकरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अजय देवगण सोबत मुख्य भूमिकेत तब्बू देखील पाहायला मिळाली आहे.

अजय देवगणचे टॉप 3 फ्लॉप चित्रपट

दे दे प्यार दे 2

2025 साली रिलीज झालेला 'दे दे प्यार दे 2 ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यास अयशस्वी ठरला. या चित्रपटात अजय देवगणसोबत रकुल प्रीत सिंग आणि तब्बू झळकल्या आहेत.

मैदान

2024 ला प्रेक्षकांच्य भेटीला आलेला अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. अजय देवगणच्या स्पोर्ट्स ड्रामा फ्लॉप ठरला.

हिम्मतवाला

2013 ला रिलीज झालेला 'हिम्मतवाला' चित्रपट सुपर फ्लॉप झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाला यश मिळाले नाही. 'हिम्मतवाला' चित्रपटात अजय देवगण तमन्ना भाटियासोबत पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT