Drishyam 3 Box Office Records 
मनोरंजन बातम्या

Drishyam 3 : 'दृश्यम ३'चा बॉक्स ऑफिसवर महाधमाका! पहिल्याच दिवशी तोडले 7 रेकॉर्ड्स; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Drishyam 3 Box Office Records : अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने पहिल्याच दिवशी अभूतपूर्व कामगिरी करत देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर अनेक विक्रम मोडले आहे.

Saam Tv

Ajay Devgan Drishyam 3 : अजय देवगणचा दृश्यम 3 द कन्क्लूजन हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अजय देवगनच्या दृश्यम 3 या चित्रपटाने बॉक्सऑफीसवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. sacnilk च्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 66.75कोटींची कमाई केली तसेच देशतभरात 95.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर धमाकेदार कामगिरीसह दृश्यम 3 या चित्रपटाने 7 मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

'दृश्यम ३' ने कोणते रेकॉर्ड मोडले -

  • 66.75 कोटींच्या कमाईसह या चित्रपटाने 'सिंघम अगेनचा' चा 43.50 कोटींचा विक्रम मोडून अजय देवगणने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

  • तसेच हा चित्रपट पहिला 50 कोटींपेक्षा जास्त ओपेनिंग देणारा चित्रपट ठरला आहे.

  • ' धुरंधर दि रिव्हेंज' नंतर 2026 मधील हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

  • 'दृश्यम 3' ने 'स्त्री2' , 'अॅनिमल' ,'पठाण',' व़ॉर' आणि 'वॉर 2' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

  • त्याचबरोर 'दृश्यम 3' हा भारतात बॉक्स ऑफिसच्या इतिहासात पहिल्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांच्या यादीत हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

  • 'दृश्यम 3' या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बळावर हा चित्रपट अजय देवगनच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

  • 'जगभरात' (Worldwide) 95.10 कोटींच्या ओपनिंगसह 'दृश्यम3' या चित्रपटाने रजनीकांत यांचा 'जेलर', प्रभासचा 'कल्कि',राम चरनचा 'पेद्दी' , सलमान खानचा 'टायगर3' आणि 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या जागतिक कमाईला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha: पितरपाठात 'या' ३ वस्तू घरी आणा; पितरांचा मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

Mumbai : शरीरात मेणाच्या कॅप्सूल अन् विमानतळ कर्मचाऱ्याची साथ, 13.73 कोटींचे सोने-हिरे जप्त

नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

India Fort : लाल दगडांच्या भव्य भिंतींमध्ये दडलाय इतिहास, 'हा' सुंदर किल्ला पाहून डोळे दिपतील

SCROLL FOR NEXT