Ajay Devgan Yandex
मनोरंजन बातम्या

Ajay devgan: 'मला फरक पडत नाही'; पानमसालावरुन ट्रोल करणाऱ्यांना अजय देवगणचं उत्तर

ajay devgan on getting troll: अजय देवगण आणि रोहित शेट्टी रणवीर अलाहाबादियाच्या पॅाडकास्टवर आले होते. पान मसाल्यावरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने काही महिन्यांपूर्वी पान मसाल्याची जाहिरात केली होती. या जाहिरातीत अजय देवगणसह, अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे सुद्धा या जाहिरातीत झळकले होते. मात्र, या जाहिरातीनंतर अभिनेत्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. या सर्व ट्रोलिंगवर अजय देवगणने रणवीर अलाहाबादिया याच्या पॅाडकास्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांची जोडी ही बॉलिवूडमधील सुपरहिट दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी म्हणून ओळखली जाते. या दोघांनी करिअरच्या सुरुवातीपासूनच एकमेकांसोबत अनेक सिनेमे केले आहेत. दोघांनी गोलमाल आणि सिंघम सारख्या हिट सिनेमांची सिरीज दिली आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन'ने बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सध्या दोघे ही सिंघम अगेनच्या यशस्वी कामगिरीचा आनंद लुटत आहेत. रोहित शेट्टी आणि अजय देवगण या दोघांनी रणवीर अलाहाबादियाच्या पॅाडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी बिनधास्त उत्तर दिले.

अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे रणवीर अलाहाबादियाच्या पॅाडकास्टवर आले होते. यावेळी रणवीरने पान मसाला जाहिरातीच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारला. 'ठिक आहे, मला फरक पडत नाही, मी सर्व एन्जॅाय करतो' अस उत्तर अजय देवगणने दिले तर 'त्यावरुन आक्षेपार्ह वाटणं बंद झाले पाहिजे, आता मीम्स मधून सगळे एन्जॅाय करत आहेत. गोलमाल, ऑल द बेस्टचेही अनेक मीम्स पुन्हा व्हायरल होत आहेत. असा रोहित शेट्टी म्हणाला.

अजय देवगण हा गेल्या काही वर्षांपासून पान मसालाची जाहिरात करत आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात येते. सोशल मीडियावर 'जुबा केसरी' या वाक्यावरुन मीम्सचा वर्षाव झाला होता. तसेच अनेक मीम्स व्हायरल झाले होते. अजय देवगणसह अक्षय कुमार, शाहरुख खान यांनी देखील काम केले होते. मात्र, सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंग मुळे अक्षयने लोकांची माफी मागत जाहिरातीतून माघार घेतली होती. आणि करार रद्द केला होता.

अजय देवगणचा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला रीलीज झाला होता. आतापर्यंत या सिनेमाने १५० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा २०० कोटींच्या क्लब मध्ये सामील होईल. अजय देवगणच्या करिअर मधला हा सर्वात मोठी ओपनिंग देणारा सिनेमा आहे.

Edited by: Priyanka Mundinkeri

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT