Aishwarya Rai Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Net Worth: बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री! शेकडो कोटींची संपत्ती, १५ कोटींच्या कार, घरे, शेअर्स अन् बरंच काही

Aishwarya Rai Bachchan Birthday: ऐश्वर्या आज बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या अभिनयाची ख्याती फक्त देशातच नाही तर परदेशातही आहे.

Chetan Bodke

Aishwarya Rai Bachchan Net Worth

बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज ५० वा वाढदिवस. ऐश्वर्या आज बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या अभिनयाची ख्याती फक्त देशातच नाही तर परदेशातही आहे. तिने अगदी लहान वयातच फार मोठी मजल मारली.

ऐश्वर्याने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यावेळी तिला मॉडेलिंग क्षेत्रात १ हजार ५०० रुपये मानधन मिळत होतं. ऐश्वर्या जेव्हा आपलं मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावत होती, तेव्हा ती अवघी १८ वर्षांची होती. दोन वर्षांनंतरच ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवला आणि जगभरात आपली ओळख प्रस्थापित केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिलेली ऐश्वर्या बिझनेसवुमन सुद्धा आहे. तिचे बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट फ्लॉप झाले असले तरी, ती बक्कळ मानधन घेते. ती एका चित्रपटासाठी तब्बल १० ते १२ कोटी रुपये इतकं मानधन आकारते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती ८२८ कोटी रुपये इतकी आहे. यात तिच्या चित्रपटांच्या मानधनासोबतच एकूण संपत्तीमागे ब्रँड एंडोर्समेंटचाही मोठा वाटा आहे. मुख्य बाब म्हणजे अभिषेक बच्चनची जेमतेम २५० कोटी रुपये इतकीच संपत्ती आहे. अभिषेकपेक्षा ऐश्वर्या रायकडे अधिक संपत्ती आहे.

ऐश्वर्या राय बच्चन सुमारे २० ब्रँड्सची ब्रँड एंडोर्समेंट आहे, त्या माध्यमातून ती वर्षाला सुमारे १०० कोटींपेक्षा अधिकचे पैसे कमावते. प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी ऐश्वर्या ६ ते ७ कोटी रुपये इतकं मानधान आकारते. लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, कल्याण ज्वेलर्स, कोका कोला, लोढा ग्रुप, पेप्सी, टायटन वॉच, लॅक्मे कॉस्मेटिक्स, कॅसिओ, फिलिप्स, पामोलिव्ह, कॅडबरी, फुजी फिल्म्स, डी बिअर डायमंड्स, टीटीके प्रेस्टीज ग्रुप यासह अनेक कंपन्यांची ती ब्रँड ॲम्बेसेडर आहे. दरम्यान, ऐश्वर्या लॉरियल या कॉस्मेटिक ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते. ऐश्वर्याने काही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली आहे.

अभिनेत्रीचे मुंबईतल्या बीकेसीमध्ये २१ कोटी रुपयांचे अलिशान अपार्टमेंट सुद्धा आहे. त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्याची दुबईतसुद्धा प्रॉपर्टी आहे. बच्चन कुटुंबीय सध्या 'जलसा'मध्ये राहते, त्या बंगल्याची किंमत ११२ कोटी रुपये आहे. याशिवाय ऐश्वर्या आणि अभिषेकने दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये सॅंक्च्युरी फॉल्समध्ये पॅलेससारखा व्हिलाही खरेदी केला आहे. यासोबतच २०१५ मध्ये, ऐश्वर्या रायचे बीकेसीमध्ये ५५०० स्क्वेअर फूटमध्ये एक लक्झरी अपार्टमेंट आहे. 38000 प्रति चौरस फूट या दराने त्यांनी ते खरेदी केलं आहे. ज्याची आज एकूण किंमत २१ कोटी रुपये आहे. (Bollywood Actress)

याशिवाय ऐश्वर्याचे मुंबईतल्या वरळी येथे स्कायलार्क टॉवर्सच्या 37व्या मजल्यावर सुद्धा एक अलिशान घर आहे, त्या घराची किंमत ४१ कोटी रुपये आहे. ऐश्वर्याकडे अनेक महागड्या कार सुद्धा आहेत. तिच्या कार कलेक्शनमध्ये, 5.25 कोटी रुपयांची Rolls Royce Phantom, 4.38 कोटी रुपयांची Range Rover Vogue, 3.8 कोटी रुपयांची Bentley Continental GT कारसह अनेक अलिशान कार तिच्याकडे आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पारनेरमधून राणी लंके आघाडीवर

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT