Aishwarya and Abhishek Bachchan Saam TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Marriage: अभिषेकवर संतापली होती ऐश्वर्या, कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

ऐश्वर्या रायने अभिषेकला दोन दिवस बेडरूममधून बाहेर ठेवले होते.

Saam Tv

Abhishek Bachchan Marriage Life: अभिनेता आणि व्यावसायिक अशी ओळख मिळविलेल्या अभिषेक बच्चनचा ४७ वा वाढदिवस आहे. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत जन्मलेल्या अभिषेकने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिषेक कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या हुशारीमुळे चर्चेत असतो. अभिषेकचे पत्नी ऐश्वर्या रायसोबत भांडण झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यामागचे सत्य स्वतः अभिषेकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

एका मुलाखतीदरम्यान खुद्द अभिषेक बच्चनने खुलासा केला होता की, ऐश्वर्या रायने त्याला दोन दिवस बेडरूममधून बाहेर ठेवले होते. यादरम्यान तो हॉलमध्ये झोपायचा.

अभिषेक बच्चन प्रो कबड्डी लीगमधील एका संघाचा मालक आहे. 2014 मध्ये, जेव्हा अभिनेत्याची टीम विजयी झाली, तेव्हा एका कार्यक्रमात तो कर्नल जेपीआरला भेटला. यादरम्यान कर्नलच्या कपाटाच्या सर्वात खालच्या शेल्फमध्ये सजवलेल्या ट्रॉफींकडे अभिषेकचे लक्ष गेले.

जेव्हा अभिषेक बच्चनने कर्नलला यांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मला माझे यश डोक्यात जाऊ द्यायचे नाही. अभिषेकला हे खूप आवडले आणि त्याने आपल्या खोलीत सजवलेले सर्व पुरस्कार खाली ठेवले.

हे पाहून ऐश्वर्याला खूप राग आला आणि अभिषेकच्या स्पष्टीकरणानंतरही तिचा राग शांत झाला नाही. ऐश्वर्याने अभिषेकला रूम बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे अभिषेकला दोन दिवस हॉलमध्ये झोपावे लागले. त्यानंतर दोघांमध्ये सर्व काही सुरळीत झाले.

'ढाई अक्षर प्रेम के' दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. यानंतर दोघेही 'गुरू' चित्रपटाच्या वेळी प्रेमात पडले. 'गुरू'च्या प्रीमियरसाठी दोघे टोरंटोला गेले होते. तेव्हा अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केले. दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT