Aishwarya-Abhishek saam tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya-Abhishek : सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या-अभिषेकने धरला ठेका; बेभान होऊन नाचले, VIDEO व्हायरल

Aishwarya Rai Dance On Salman Khan Song : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने सलमान खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

ऐश्वर्या राय कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या रायने डान्स केला.

ऐश्वर्या आणि अभिषेकचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यसाठी ओळखली जाते. गेल्या अनेक काळापासून ती वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे. अशात आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन नीता अंबानींसोबत डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन चक्क बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुदित अदानी आणि अनन्या दिवानजी यांच्या लग्न सोहळ्यातला आहे. व्हिडीओत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, नीता अंबानी अजून अनेक लोक स्टेजवर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. सलमान खानच्या 'सलाम-ए-इश्क' गाण्यावर सर्वजण बेभान होऊन नाचताना दिसत आहेत.

2007 साली रिलीज झालेल्या 'सलाम-ए-इश्क' चित्रपटातील हे गाणे आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा झळकली आहे. लग्न समारंभात हे गाणे आवर्जून वाजवले जाते. या गाण्यावर ऐश्वर्या-अभिषेक सुंदर डान्स करताना दिसत आहेत. दोघेही समारंभाचा, गाण्याचा आणि डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते.

ऐश्वर्याने सुंदर शिमरी निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तर अभिषेकने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांनी मॅचिंग केले आहे. या व्हिडीओवर चाहते, नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या समारंभाला बॉलिवूडचे अनेक कलाकार पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

SCROLL FOR NEXT