Yuzvendra Chahal Dating RJ Mahvash : सध्या क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेगळे होण्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येत आहेत. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यावर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. एकीकडे, धनश्रीचे नाव एका कोरिओग्राफरशी जोडले जात आहे. त्याच वेळी, चहलचे नाव आरजे महवशशी जोडले जात आहे. युजवेंद्र चावलसोबत आरजे महवाशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तिला क्रिकेटपटूची कथित प्रेयसी म्हटले जात आहे. यावर आता आरजे महवशने प्रतिकिया दिली आहे.
आरजे महवाशने पोस्ट शेअर केली
क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत तिचे नाव सतत जोडले जात असताना, आता आरजे महवाशने स्वतः या संपूर्ण प्रकरणावर प्रतिकिया दिली आहे. महवशने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि क्रिकेटपटूसोबतच्या तिच्या संबंधांबद्दलच्या बातम्यांवर राग व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये आरजे महवश यांनी लिहिले की, 'इंटरनेटवर काही बातम्या आणि अटकळ पसरत आहेत. या अफवा किती निराधार आहेत हे पाहणे खरोखर मजेदार आहे. जर तुम्हाला कोणत्या पुरुषसोबत पाहिले गेले तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला डेट करत आहात का?
पुढे महवशने लिहीले, हे कोणते वर्ष सुरु आहे? आणि मग तुम्ही किती जणांना डेट करत आहात? मी २-३ दिवसांपासून धीर धरला आहे पण इतरांची प्रतिमा लपवण्यासाठी मी कोणत्याही पीआर टीमला माझे नाव यात ओढू देणार नाही. या कठीण काळात मला माझ्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शांततेत राहू द्या.
अनफॉलो केले
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा डिव्होर्सच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. चहलने धनश्रीचे फोटोही डिलीट केले आहेत, पण धनश्रीने अद्याप तसे केलेले नाही. युजवेंद्रसोबतचे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत. या बातमीने चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या क्रिकेटपटू आणि त्याच्या पत्नीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले आणि त्यांच्या लग्नाची मीडियामध्ये खूप चर्चा झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.