Mission Impossible Theatre Scene In Pathaan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mission Impossible Copied Pathaan Scenes: हॉलिवूडपण करतंय सीन चोरी?; ‘पठान’मधील ‘ती’ घटना Mission Impossibleने चोरली..

Mission Impossible Copied Pathaan: ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची तुलना चाहते, शाहरुख खानच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठान’ चित्रपटाशी करत आहेत.

Chetan Bodke

Mission Impossible Theatre Scene In Pathaan: अनेक हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांची कॉपी करतात म्हणून प्रेक्षक अनेकदा बॉलिवूड चित्रपटांना ट्रोल करतात. त्यातील अनेक चित्रपट असे आहेत, त्यांचे बॉलिवूड चित्रपट अनेक सीन्स कॉपी करतात. त्यामुळे नेटकऱ्यांकडून त्या चित्रपटांना कमालीचं ट्रोल केले जाते. सध्या अशाच एका हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची तुलना चाहते, शाहरुख खानच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठान’ चित्रपटाशी करत आहेत.

‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. या चित्रपटात IMF एजंट एथन हंट म्हणजेच टॉम क्रूझ एका नवीन मिशनवर जातो. चित्रपटात दमदार ॲक्शन सीक्वेन्स आणि स्टंट्स आहेत जे प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतात. मात्र, ट्रेलर पाहून प्रेक्षकांना ‘पठान’चे अनेक सीन्सच आठवत आहेत. (Hollywood)

‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’मधील अनेक सीन कॉपी केलेले फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांच्या मते, हा ट्रेलर ‘पठान’चे अनेक सीन्स कॉपी केले आहे, असे म्हणत आहे. एवढेच नाही तर शाहरुखचे चाहतेही हा प्रश्न विचारत आहेत, आता कॉपी बोलणार नाही का? बॉयकॉट करणारे आता गप्प का आहेत? ते आता कॉपी का म्हणत नाहीत? मिशन इम्पॉसिबलने ‘पठान’ चित्रपटाची कॉपी केली आहे, असे ते का म्हणत नाहीत? फक्त हॉलिवूडचा चित्रपट आहे म्हणून काहीच बोलायचं नाही का? असा सवाल उपस्थित केला. (Entertainment News)

नेटकरी ट्रोल करत म्हणतात, बघा, आता हॉलिवूडचे लोकही बॉलिवूडला कॉपी करत आहेत? तर आणखी एक युजर म्हणतो, काही दिवसांपूर्वी मी पाहिलं की नेटकऱ्यांनी ट्विटरवर ‘पठान’च्या एका सीनची खिल्ली उडवली होती, कारण ते चुकून जॅकी चॅनच्या कार्टूनसारखे होते, पण आता ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’मध्येही तेच घडत आहे. एक सीन आहे, पण आता कोणीही काहीही बोलणार नाही.

माहितीसाठी सांगतो, हा चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’ येत्या १२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर मॅकगुयर यांनी केले आहे. ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग १’ या चित्रपटात टॉम क्रूझ व्यतिरिक्त विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT