Sudipto Sen New Film First Poster Shared Twitter
मनोरंजन बातम्या

Sudipto Sen New Film Announce: ‘द केरला स्टोरी’नंतर सुदिप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, ट्विटरवरून दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’

Sudipto Sen New Film First Poster Shared: ‘द केरला स्टोरी’ला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे..

Chetan Bodke

Sudipto Sen Direct Subrata Roy's Biopic: सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने एकंदरित बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या पण पुढे कमाई केली आहे. महिन्याभरानंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. ‘द केरला स्टोरी’ला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे..

सुदिप्तो सेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या चित्रपटाची घोषणा केली. सुदिप्तो सेन आणि निर्माते संदीप सिंह हे दोघेही एकत्र काम करणार असल्याची माहिती खुद्द दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी दिली. सोबतच यावेळी ट्विटरवर माहिती देताना, हातात २५ हजार कोटींचा धनादेश धरलेल्या माणसाचा फोटो त्यांनी शेअर केला. व आपला आगामी चित्रपट हा ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या जीवनावर चित्रित केलेला चित्रपट असेल.

ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांचा १० जून रोजी ७५ वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बायोपिकची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे नाव ‘सहाराश्री’ असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन करत असून चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, डॉ. जयंतीलाल गडा यांनी केली.

‘इंडिया टुडे’ने २०१२ या वर्षी सुब्रत रॉय यांना वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून घोषित केले होते. भारतातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचा उल्लेख प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकातही करण्यात आला. चित्रपटाची कथा त्यांच्या संघर्षापासून ते देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्याचा त्यांचा प्रवास उलगडणार आहे.

चित्रपटाचे गीतकार गुलजार असून चित्रपटातील संगीताची जबाबदारी ए.आर.रहेमान यांच्याकडे आहे. अद्याप तरी, सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणार याची माहिती गुलदस्त्यातच आहे. प्रमुख भूमिकेसाठी सध्या निर्माते बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत बोलत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT