Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pathaan Sequel: ‘पठान’च्या यशानंतर चित्रपटाचा सिक्वेल येणार, ! दिग्दर्शकांची मोठी घोषणा...

चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली.

Chetan Bodke

Pathaan Sequel: गेल्या वर्ष भरात अनेक बॉलिवूड चित्रपट सतत अपयशी ठरले होते. या सर्वांची कमी एकाच चित्रपटाने दणक्यात भरून काढली असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटाने जगभरात एकूण ५४३ कोटींचा गल्ला जमवला असून देशभरात २८० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली.

चित्रपटाला मिळालेल्या दमदार यशानंतर सर्वच टीमने काल माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी सर्वांनीच अनेक प्रश्नांची उत्तर अगदी दिलखुलास पद्धतीने दिली. यावेळी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला “‘पठान’ नंतर आता बॉलिवूडमध्ये कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थ आनंदने ‘पठान’च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘पठान २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केले.

शाहरुखच्या ‘पठान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कालपर्यंत या चित्रपटाची कमाई तब्बल ५४३ कोटींपर्यंत होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शकांसह चित्रपटातील कलाकारही भारावुन गेले होते. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत.

‘पठान’ चित्रपटातून शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर तब्बल चार वर्षांनंतर दमदार कमबॅक केले. त्यामुळे मोठ्या स्क्रिनवर आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते आतूर होते. आता सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठान २’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT