Shah Rukh Khan  SaamTv
मनोरंजन बातम्या

Pathan Controversy: शाहरुख खान वादाच्या विळख्यात, पठाननंतर आणखी एका चित्रपटावरुन वादाला सुरुवात

अखिल भारतीय हिंदू सभेचे कार्यकर्ते 'डंकी' चित्रपटाला विरोध करत आहेत.

Pooja Dange

Shah Rukh Khan Movie: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान साध्य त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या 'पठान' चित्रपटावरून होणारा वाद अजून क्षमला नाही तर शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि शूटिंगदरम्यान या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. अखिल भारतीय हिंदू सभेचे कार्यकर्ते 'डंकी' चित्रपटाला विरोध करत आहेत.

राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनात बनत असलेला 'डंकी' या चित्रपटामध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. तापसी पन्नू या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखसोबत पहिल्यांदा काम करणार आहे. या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. (Movie)

माध्यमांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार, विष्णू परिषद आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते मिळून 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंग सेटच्या येथे आंदोलन करण्यात आले. शूटिंग सुरू असल्याने तिथे पोलिस उपस्थित होते. असे असूनही विरोध करणाऱ्यांनी बॅरिकेट तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदोलनकर्ते शाहरुखच्या विरोधात घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी चित्रपटातील कोणताही मुख्य कलाकार तेथे उपस्थित नव्हते.

शाहरुखच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी दिल्यामुळे आंदोलनकऱ्यांनी जबलपूरच्या कलेक्टर विरोधातही घोषणा देण्यात आल्या. तसेच जबलपूर शहराचे पोलिस अधिक्षक प्रियंक शुक्ला यांनी पीटीआयला सांगिलते की, 'आम्ही संयम बाळगून आहोत. जबलपूरच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार चित्रीकरण होत आहे. शुक्रवारीच त्यांचे शूटिंग पूर्ण होईल. शूटिंग थांबवण्यासाठी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.' (Shah Rukh Khan)

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठान' चित्रपटातील पहिले गाणे 'बेशरम रंग' प्रदर्शित झाल्यापासून वादाला सुरूवात झाली आहे. गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे गदारोळ होत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि दीपिकासह जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT