prajakta mali on suresh dhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Reaction : विषय संपला! सुरेश धस यांच्या दिलगिरीवर प्राजक्ता माळी म्हणाली, दादा खूप धन्यवाद!

Prajakta Mali : आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टिकेसाठी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ताने सुरेश धस यांचे आभार मानून या प्रकरणाचा शेवट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prajakta Mali : बीड प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंट बद्दल भाष्य करताना आमदार सुरेश धस यांनी रश्मिका मंदानासह प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडेंवर टीका केली होती. या टीकेमुळे महिला आयोगाकडे तक्रार करत पत्रकार परिषदेत धस यांनी त्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली होती. त्यानंतर काल सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर सुरेश धस यांनी या प्रकरणाबद्दल दिलगीर असल्याचे पत्रकारांसमोर सांगितले होते. त्यांच्या दिलगिरीवर प्रतिक्रिया म्ह्णून अभिनेत्री प्राजक्त माळीने सुरेश धस यांचे आभार मनात या प्रकरणाचा शेवट केला आहे. या संदर्भात एक व्हिडीओ प्राजक्ताने शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये प्राजक्ता म्हणाली, संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कुटुंबीयांना अनेक मेसेज आले. महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरांतून आवाज उठवला गेला. मला पाठिंबा दिला गेला, यामुळे आम्हाला फार बळ मिळाल आणि समाधान वाटलं. खूप खूप धन्यवाद! याशिवाय आमदार सुरेश धस यांचेही मी मनापासून आभार मानते.

अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिलावर्गाची माफी मागितली. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, 'दादा खूप धन्यवाद' तुम्ही मागितलेल्या माफीमुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंत. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेजण जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे त्यांचे विचार सदैव इथे असतील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे.”

तसेच, प्राजक्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आयोगाचे आभार मानत म्हणाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. त्यांनी यात जातीने लक्ष घातलं. अत्यंत निगुतीने आणि संवेदनशीलतेने त्यांना हा विषय पुढे नेला, मार्गी लावला. त्याचबरोबर महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील आभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT