Salman Khan Imported new bullet proof Car
Salman Khan Imported new bullet proof Car  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Security: लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने घेतली 'बुलेटफ्रूफ' कार; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

Pooja Dange

Salman Khan imports new bulletproof Nissan Patrol SUV: सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून गेल्या काही दिवसांपासून जिवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सततच्या धमक्यांमुळे स्वतःच रक्षण करण्यासाठी अभिनेता सलमान खानने नवी बुलेटप्रूफ एसयूव्ही कार खरेदी केली आहे. 'निसान' कंपनीचे सर्वात महागडी कार 'निसान पेट्रोल' सलमाने त्याच्या ताफ्यात सामील केली आहे.

सलमानने घेतलेली ही कार अद्याप भारतीय बाजारपेठेतही दाखल झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकीचे ई-मेल आले होते. या प्रकरणात गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले होते. तेव्हापासून सलमान पांढऱ्या रंगाची बुलेटप्रूफ लँड क्रूझर एसयूव्ही वापरत आहे.

सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातून मागवली आहे. सलमानची नवीन एसयूव्ही दक्षिण आशियाई देशात सर्वात लोकप्रिय आणि महागडी वाहनांपैकी एक मानली जाते. या बुलेटप्रूफ वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे कार अतिशय खास आहे. सलमानची नवीन पांढऱ्या रंगाची चमचमणारी कार घेऊन सलमान एका कार्यक्रमाला आला होता सर्वांच्या हे लक्षात आलं.

सलमानने घेतलेली या कारची किंमत काय आहे याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. कारण ही कार देशात उपलब्ध नाही. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत सुमारे 80 लाख ते 1 कोटी रुपये असेल. मात्र, सलमानची कार बुलेटप्रूफ असल्याने तिची किंमत जास्त असणार आहे, हे नक्की.

सलमान खानच्या या कारची खासियत म्हणजे यात 5.6-लीटर V8 पेट्रोल इंजिन आहे. विशेष बाब म्हणजे याचे छोटे 4.0-लिटर V6 पेट्रोल इंजिन UAE मध्ये देखील उपलब्ध आहे. या कारचे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय या वाहनात लॉकिंग सिस्टिमही पूर्णपणे वेगळी आहे.

सलमान खान नुकताच एका कार्यक्रमात पोहोचला. यादरम्यान, तेव्हा तो निसान एसयूव्हीमध्ये दिसला होता. सलमानकडे टोयोटा फॉर्च्युनर आणि महिंद्रा बोलेरो निओ सारख्या अनेक गाड्या होत्या. त्याच्या खाजगी सुरक्षेशिवाय मुंबई पोलीस अधिकारी देखील सलमासोबत या कार्यक्रमात दिसले होते.

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह पूजा हेगडे, व्यंकटेश, पलक तिवारी, शहझाज गिल देखील आहेत. या चित्रपटातील ३ गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात विमाननगर परिसरातील सोसायटाला लागली आग

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SCROLL FOR NEXT