Urvashi Rautela Marriage Porposal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela Marriage Porposal: अरेच्चा... ऊर्वशीला थेट पाकिस्तानातून लग्नाची मागणी; ‘नवरी तयार असेल तर…’ म्हणत क्रिकेटरने दिली लग्नाची कबुली...

उर्वशी आणि ऋषभच्या रिलेशनच्या चर्चा होत असताना दुसरीकडे, उर्वशीचे पाकिस्तानी क्रिकेटर सोबत नाव जोडले जात आहे.

Chetan Bodke

Urvashi Rautela Marriage Porposal: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. चित्रपटांसोबतच म्युझिक अल्बममधून काही प्रमाणात प्रकाशझोतात आलेली उर्वशी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटसंघातील क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत तिचे नाव जोडले जाते. सोबतच त्यांच्या नात्याचीही अनेकदा चर्चा देखील झाली आहे. एकीकडे उर्वशी आणि ऋषभच्या रिलेशनच्या चर्चा होत असताना दुसरीकडे, उर्वशीचे पाकिस्तानी क्रिकेटर सोबत नाव जोडले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर उर्वशीची एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना काही वेळासाठी धक्काच बसलेला आहे. ऋषभ पंतसोबत चर्चेत राहणारी उर्वशी पाकिस्तानातल्या कलाकारासोबत कशी काय चर्चेत आली असा प्रश्न पडला आहे.

उर्वशीचं नाव आता थेट आता पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह सोबत जोडलं जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहने तिला पाकिस्तानातूनच लग्नाची मागणी घातली आहे. यापूर्वी अनेकदा नसीमचं नाव उर्वशीसोबत जोडलं होतं. नुकत्याचा झालेल्या एका पत्रकार परिषदेत नसीमने उर्वशीसोबत लग्न करण्याची ही मनातली इच्छा सर्वांसमोर व्यक्त केली आहे.

गेल्याच महिन्यात उर्वशीचा वाढदिवस झाला, त्यावेळी तिच्या वाढदिवसाची देखील बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. उर्वशीच्या वाढदिवसाला नसीमने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. पत्रकार परिषदेत यावेळी नसीमला उर्वशीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी पत्रकार नसीमला म्हणतात, ‘उर्वशीला एखादा मेसेज दे….’

यावर नसीम म्हणतो, ‘मी कोणता मेसेज दिला तर तुम्ही व्हायरल कराल…’ सोबतच क्रिकेटर नसीम खानला पत्रकारांनी लग्नाबद्दलही काही प्रश्न विचारले होते. यावर नसीम म्हणतो, ‘नवरी तयार असेल, तर लग्न करेल…’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो इडिट केला आहे… अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच धुम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyasabha Election: काँग्रेसची नवी खेळी, राज्यसभेच्या एका जागेवर दावा; उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव

OTT Release This Week: या आठवड्यात, ओटीटी मनोरंजनाची मेजवानी; प्रदर्शित होणार हे भन्नाट सिरीज आणि चित्रपट

Maharashtra Live News Update : इराण युद्धाचा फटका नाशिकच्या कांद्याला, अनेक कंटेनर अडकून पडले

Solapur : सोलापूरमध्ये १३ वर्षीय मुलाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Small Mangalsutra Designs: छोट्या मंगळसूत्राचे 5 नवीन पॅटर्न, साडी आणि ड्रेसवर दिसतील भारी

SCROLL FOR NEXT