Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss : बिग बॉसनंतर 'या' अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना; चक्क एक फॅन मरणावर उठला, म्हणाला...

Veena Jagtap : मराठी अभिनेत्री वीणा जगतापने बिग बॉसनंतर तिला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले याचा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री वीणा जगताप सध्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम करत आहे. यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. अभिनेत्री वीणा जगताप ही बिग बॉस मराठी 2 मध्ये पाहायला मिळाली आहे.

एका मिडिया मुलाखतीत तिने बिग बॉस नंतरच्या ट्रोलिंगचा एक किस्सा सांगितला आहे. मुलाखतीत विणाला विचारण्यात आले की, "बिग बॉसनंतर तू कौतुक आणि टीकांना कशी सामोरी गेली. यावर वीणाने सांगितले की, बिग बॉसनंतर खरी लोकप्रियता काय असते हे समजले. मात्र तेवढेच ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. मी ट्रोलिंगला नेहमी खेळाडू वृत्तीने घेतलं. काही लोक एक लाइन क्रॉस करून बोलतात."

पुढे वीणा (Veena Jagtap ) बोली म्हणाली की, "मला तर एका फॅन पेजने तू मरत का नाहीस? असा मेसेज केला. हाच मेसेज माझ्या आईलाही करण्यात आला. मात्र असे कोणाला बोलू नये. २००९ मध्ये माझे वडील गेले तेव्हा पासून आईने खूप संघर्ष करून आम्हाला मोठे केले आहे. जेव्ही मी स्वतःसाठी ही फिल्ड निवडली तेव्हा आई बोली होती की, जॉब कर ना, महिन्याला एक ठराविक रक्कम हातात येईल. या सर्वानंतर तिला जर तुमची मुलगी मरत का नाही असे विचारल्यावर तिचे काय होत असेल. पण मी मात्र या सर्व गोष्टी खेळाडू वृत्तीने घेतल्या. तेव्हा माझं ऐवढचं होत की मला ट्रोल करू नका."

शेवटी वीणा म्हणाली की, बिग बॉसमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. म्हणून मला लोकांनी ट्रोल केलं. तसेच चांगल्यासाठी कौतुकही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anti-Liquor Women Brigade:वलनी गावात दारूविरोधात महिला शक्ती; उभारली दारूविरोधी फौज

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

शेतकरी कर्जमाफीसाठी 'अॅग्रिस्टॅक'ची अट; कर्जमाफी हवी तर 'फार्मर आयडी' बंधनकारक

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

SCROLL FOR NEXT