मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: डंके की चोट पे... बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते?

Advocate Gunratna Sadavaete in Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'ला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना यामध्ये नेमकं कोणते कलाकार दिसणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

कलर्सवरील बिग बॉसची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'बिग बॉसचं 18'ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या १८व्या पर्वात कोणते सदस्य दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामधील काही सदस्यांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु बिग बॉसच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.

बिग बॉस १८च्या सदस्यांच्या यादीमध्ये अजून एका व्यक्तीचे नाव जोडले जात आहे. तो स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून वकिल गुणरत्न सदावर्ते आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: ते बिग बॉस हिंदीमध्ये झळणार आहेत याची घोषणा केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे बिग बॉसच्या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत पाहायला मिळणार एसे सर्व प्रेक्षकांना वाटत आहे. त्यासोबतच अणखी कोणते कलाकार बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल बोलायचे तर, त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गुणरत्न सदावर्ते नेहमी त्यांच्या कायद्याच्या वादग्रस्त भाष्यामुळे आणि ओरडून बोलण्याच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एका मुलाखाती दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉस हिंदीमधून ऑफर आली आहे अशी त्यांनी माहिती दिली होती.

बिग बॉस १८ च्या ऑफरबद्दल बोलताना सदावर्तेंनी सांगितले की, "बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे २ महिने लोकं माझ्याकडे फेऱ्या मारत आहेत. बिग बॉसचा प्रोडक्शन मॅनेजर दोन महिने अॅग्रिमेंट घेऊन माझ्याजवळ फेऱ्या मारत होते. जेनीला खतरों के खिलाडी यांच्याकडून ऑफर आली होती. त्यांनी जेनीची सहा महिने वाट पाहिली होती. परंतु आमचं जीवन व्यस्त असल्यामुळे जेनीला त्यामध्ये सहभागी होता आलं नाही." बिग बॉस १८चा ग्रॅंड प्रिमियर ६ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT