Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Donkey in Bigg Boss House : बिग बॉस 18 मध्ये माणसांसोबत आता गाढवाची ही एन्ट्री होणार आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसचा 18 (Bigg Boss 18) आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा चाहत्यांना भाईजानला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. यंदाचा बिग बॉसचा सीझन खूप खास ठरणार आहे. कारण यंदाची थीमच खूप हटके आहे. यंदा बिग बॉसच्या घरात 'भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य'समजणार आहे. तसेच कोणते स्पर्धक पाहायला मिळतील याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या सीझन मध्ये अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. अशात प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte ) देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहेत. गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहीले आहेत. त्यांनी एसटी कामगारांच्या संपात मोठे योगदान दिले आहे. तसेच कामगारांची संघटना निमार्ण केली आहे. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात मात्र ते एकटे येत नसून त्यांच्यासोबत एक प्राणी देखील येणार आहे. हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून गुणरत्न सदावर्ते यांचं पाळीव गाढव (Donkey ) आहे. या गाढवाचे नाव 'मॅक्स' असे आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही गाढवाला पाहू शकता. बिग बॉसच्या स्टेजवर गाढव फिरताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे गाढव बिग बॉसच्या घरात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत राहणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार होणार आहे. आता स्पर्धकांसोबत गाढव देखील काय धुमाकूळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT