Aditya Roy Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Aditya Roy Kapoor Birthday Special: बॉलिवूडमध्ये आदित्यने त्यांच्या अभिनयाने दमदार छाप उमटवली आहे. आदित्य रॉय कपूर हा त्याच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला आहे.

Manasvi Choudhary

आशिकी 2 फेम आदित्य कपूरचा (Aditya roy kapoor) आज वाढदिवस आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या अदित्यच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला प्रचंड यश मिळवून दिले. बॉलिवूडमध्ये आदित्यने त्यांच्या अभिनयाने दमदार छाप उमटवली आहे. आदित्य रॉय कपूर हा त्याच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला आहे. आज आदित्य रॉय कपूर त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आदित्यच्या सिनेसृष्टीतील कारकीर्द जाणून घेऊया.

आदित्य रॉय कपूर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९८५ मध्ये मुंबईतमध्ये झाला आहे. आदित्य आज ३९ वर्षाचा झाला आहे. आदित्य रॉय कपूरला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्या क्रिकेटर (Cricketer) व्हायचे होते. शाळेमध्ये असताना आदित्य रॉय कपूर क्रिकेट खेळण्यामध्ये लक्ष द्यायचा. मात्र आदित्यची आई शाळेत नाटक दिग्दर्शित करायची यामुळे त्यालाही अभिनयाची आवड निर्माण झाली. यानंतर आईकडून अभिनयाचे धडे मिळाल्यानंतर आदित्यने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

आदित्य रॉय कपूरने त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरूवात सुपरस्टार अजय देवगण आणि सलमान खानच्या लंडन ड्रीम्स चित्रपटातून केली. यानंतर त्याने गुजारिश आणि अॅक्शन रिप्ले हे चित्रपट केले. आदित्य रॉय कपूरने आपल्या चित्रपट कारकि‍र्दीत ये जवानी है दिवानी, डियर जिंदगी, फितूर यासारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे आशिकी 2 या चित्रपटातूनच. आशिकी 2 मध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्यची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

आदित्य रॉय कपूर अलिशान लाईफ जगतो आहे. अभिनेता एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो. तो महिन्याला सुमारे ७० लाख रुपये कमावतो. आदित्य एका वर्षात १ कोटींहून अधिक कमावतो. याशिवाय तो मुंबईतही त्याचे स्वत:चे अतिशय आलिशान अपार्टमेंट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT