Aadipurush Poster  Instagram@actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Controversy : जय श्री राम! 'आदिपुरूष'चं स्क्रीनिंग सुरू असताना थिएटरमध्ये राडा, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला

Mumbai News : आदिपुरुष सिनेमाातील डायलॉग आण सीनमुळे सिनेमावर थेट बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bollywood News : रिलीजच्या आधीपासूनच वादात अडकलेला आदिपुरुष सिनेमा रिलीजनंतर चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाातील डायलॉग आण सीनमुळे सिनेमावर थेट बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

अशात नालासोपारा येथे काल 18 जून रोजी काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका मल्टीप्लेक्समध्ये शिरुन शो सुरु असताना गोंधळ घातला. आंदोलकांनी चित्रपटाचा शो काही काळ बंदही पाडला. यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी वादही घातला.

हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मल्टिप्लेक्समध्ये आत शिरले आणि त्यांनी मुलांना असे चित्रपट दाखवणे टाळावे, असं दर्शकांना सांगितले. मल्टिप्लेक्सच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी या आंदोलकाना बाहेर जाऊन आपले म्हणणे मांडण्यास सांगितले.

कितीही मोठे लोक असले तरी आम्ही त्यांचा विरोध करणार. यासाठी आम्हाला फासावर जावं लागलं तरी आम्ही जावू, असा इशाराही आंदोलकांना दिला. त्यावेळी त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.  (Live Marathi News)

हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांना आम्ही विरोध करतच राहणार असल्याचं आंदोलकांना यावेळी म्हटलं. यावेळी या विरोध करणाऱ्यांनी 'शेम ऑन बॉलिवूड'च्या घोषणाही दिल्या.

वादाचं कारण काय?

ओम राऊत दिग्दर्शित आणि टी-सीरिज निर्मित आदिपुरुष या बिग बजेट चित्रपटावर VFX आणि डायलॉगमुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. या चित्रपटातील 'लंका दहन'च्या एका दृश्यातील हनुमानाच्या संवादांवरही सोशल मीडिया यूजर्स टीका करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT