Kriti Sanon On Adipurush
Kriti Sanon On Adipurush Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Controversy In Nepal : प्रदर्शनाच्या काही तासापूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटामध्ये केला मोठा बदल

Pooja Dange

Adipurush Makers Did Big Changes In Movie : ओम राऊत दिग्दर्शित प्रभास स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करायला सुरूवात केली आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग, देवदत्त आणि सैफ अली खानचे चाहते चित्रपटाला तुफान प्रतिसाद देत आहे. चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल होता.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चित्रपटात मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर नेपाळमधील चित्रपटाविषयीचा वाद कमी होईल, अशी अपेक्षा आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून नेपाळमध्ये 'आदिपुरुष'च्या एका डायलॉगवरून वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात 'सीता ही भारताची कन्या आहे' असे म्हटले होते, ज्याला नेपाळच्या लोकांनी विरोध केला होता. नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी या डायलॉगवर आक्षेप घेतल्याने प्रकरण गंभीर झाले. त्यानंतरच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटातून हा संवाद काढून टाकला. हा निर्णय चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच घेण्यात आला आहे.

'ओम राऊत यांच्या आगामी चित्रपटातील चूक सुधारली नाही, तर यापुढे नेपाळच्या राजधानीत एकही भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार नाही', असे काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी सांगितले.

बलेन यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते की, 'जानकी भारत की बेटी है हा डायलॉग आदिपुरुष या दक्षिण भारतीय चित्रपटात बोलला जात आहे, जो केवळ नेपाळमध्येच नाही तर भारतातही चुकीचा आहे. जोपर्यंत चित्रपटातील हा संवाद हटविला जात नाही, तोपर्यंत काठमांडू महानगरपालिकेत हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी असेल. सोबतच ते दुरुस्त करण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (Movie)

एवढेच नाही तर नेपाळ सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली नाही. वास्तविक रामायणानुसार सीतेचा जन्म मिथलाच्या जनकपूरमध्ये झाला होता. त्यावेळी बिहारला लागून असलेल्या नेपाळला मिथला म्हणत. रामाशी लग्न करून माता सीता भारतात आली. याविरोधात नेपाळमध्ये निदर्शने झाली. तूर्तास, अशी अपेक्षा आहे की चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या या मोठ्या बदलानंतर, नेपाळमधील निषेध कमी होईल आणि तेथेही चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जाईल.

आदिपुरूष चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक वाद निर्माण झाले होते. सीतेच्या भांगेत सिंदूर नसल्याने, रावणामुळे वाद निर्माण झाला होता आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या संवादावरून वाद निर्माण झाले होते. ओम राऊत यांनी चित्रपटात वेळोवेळी बदल करून केले. अखेर आज चित्रपट प्रदर्शित झाला.

16 जून रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपट रिलीज केला आहे. या चित्रपटात प्रभास श्री राम, कृती सीतेच्या भूमिकेत दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेणार

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT