Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy  Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Rakhi-Adil Wedding: राखी सावंत हमसून हमसून रडली, शेवटी आदिलनं लग्न झाल्याचं केलं 'कबुल'

आदिलने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या लग्नाचा स्वीकार केला आहे.

Pooja Dange

Rakhi Sawant - Adil Khan Marriage Controversy: राखी सावंत ड्रामा हे एक समीकरण आहे. राखी जेव्ह कॅमेरासमोर येते तेव्हा धमाका होतो. सध्या राखीच्या आयुष्यात धमाका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीचे रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याचे कारण आदिल आणि राखीचे लग्न. आदिलने यावर आता पूर्णविराम लावला आहे. आदिलने आता त्यांचे लग्न कबूल केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हिडिओमध्ये राखी मुसमुसून रडताना दिसत होती. राखी आणि आदिलच्या लग्नच फोटो व्हायरल झाल्यापासून राखी त्रासात असल्याचे दिसत होते. राखीने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून तिने आदिलशी सिक्रेट वेडिंग केल्याचे सांगितलं होते. परंतु आदिलकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. तसेच त्याने यावर बोलण्यासाठी वेळ देखील मागितला होता.

राखी-आदिलच्या लग्नाचा सस्पेन्स आता संपला आहे. आदिलने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या लग्नाचा स्वीकार केला आहे. आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे आहे की, अखेर मी अधिकृतरित्या जाहीर करत आहे. मी कधीच असे म्हटले नाही की, 'मी तुझ्याशी लग्न केले नाही राखी. परंतु मला काही गोष्टी हॅन्डल करायच्या होत्या, त्यामुळे मला गप्प राहावं लागलं. आपल्या दोघांना या सुखी लग्नाच्या शुभेच्छा. तसेच आदिलने राखीला प्रेमाने पाप्पुडी म्हटले आहे.

आदिलच्या या पोस्ट राखी लगेच प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले आहे की, धन्यवाद जान, खूप खूप प्रेम. अनेक सेलिब्रिटी देखील राखी-आदिलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचे फॅन्स देखील त्यांचे अभिनंदन करत आहेत.

राखी आणि आदिल यांचे लग्न ७ महिन्यांपूर्वी झाले होते. राखी 'बिग बॉस मराठी ४'मध्ये गेल्यानंतर आदिलचे दुसऱ्या कोण्यासोबत तरी अफेअर सुरू झाले होते. त्यामुळे राखीने त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आणले. परंतु आदिल यावर काहीही बोलण्यास तयार नव्हता. आदिलशी लग्न कारण्यासाटःई राखीने धर्म परिवर्तन केले आहोत. तसेच राखी हे नाव बदलून फातिमा केले आहे.

राखी आणि आदिल दुबईतील एका इव्हेंटमध्ये एकत्र सहभागी झाले होते. त्यानंतर राखीचे रडतानाचे व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले होते. आदिलच्या या कबुलीनंतर आता त्यांचं नातं सुरळीत होईल अशी अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन; सांगोला परिसरात शोककळा

Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंची बॉक्स ऑफिसवर हवा, दुसऱ्या सोमवारी 'राजा शिवाजी'नं किती कमावले?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT