Ada Sharma Hospitalize Instagram
मनोरंजन बातम्या

Ada Sharma Health Update: अदा शर्माची अचानक तब्येत बिघडली, रूग्णालयात उपचार सुरू...

Ada Sharma News: अदा शर्मा हिची तब्येत खालावल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chetan Bodke

Ada Sharma Hospitalize: सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा चित्रपटाच्या माध्यमातून बरीच चर्चेत आली आहे. पण यावेळी अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अदा शर्मा हिची तब्येत खालावल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अदा शर्माला फूड ॲलर्जी झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीला डायरियाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे.

IANS या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माला मंगळवारी तिची परिस्थिती खालावल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. दरम्यान अभिनेत्रीला ‘कमांडो’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अतिसार आणि फुड ॲलर्जीमुळे तिची प्रकृती खालावली.

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. सोबतच अभिनेत्रीने डॉक्टरांनी दिलेल्या चाचण्या देखील सुरू आहेत. अदा शर्माच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टला प्रमोशन दरम्यान अचानक सकाळी तब्येत बिघडली. तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे ती अशक्तही झाली. लगेचच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘कमांडो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने भावना रेड्डी नावाचे पात्र साकारले. ॲक्शन थ्रिलर असलेली ही वेबसीरिज येत्या ११ ऑगस्ट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे. वेबसीरिजमध्ये अदा शर्मासोबतच प्रेम जिजिरीया, अमित सियाल, तिग्मांशु धुलिया, मुकेश छाबरा, वैभव तत्ववादी आणि इश्तियाक खान देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT