Yogita chavan and Sourabh chougule Marathi Couple Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Couple Divorce: लग्नानंतर वर्षभरातच 'या' मराठी कपलच्या नात्यात दुरावा...; नेमकं कारण काय?

Yogita chavan and Sourabh chougule: योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र दोघांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Shruti Vilas Kadam

Yogita chavan and Sourabh chougule: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या नात्यात लग्नाच्या एकावर्षातचं दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोघांनी सोशल मिडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्यामध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या अफवा रंगल्या आहेत.

दोन वर्षाआधी “जीव माझा गुंतला” मालिकेत एकत्र काम करताना हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडलेले त्यानंतर ३ मार्च २०२४ रोजी हे कपल विवाहबंधनात अडकले होते. मात्र लग्नानंतर केवळ वर्षभरातच त्यांच्या नात्यात अंतर आल्याचे संकेत सोशल मिडियावर दिसू लागले आहेत.

परिस्थिती अशी आहे की, योगिताने तिच्या इन्स्टाग्रामअकाउंटवर सौरभसोबतचे काही फोटो हटवले आहेत. तसेच सौरभने नुकत्याच आपल्या घराच्या सजावटीचा फोटो शेअर केला आहे पण यामध्ये योगिता दिसलेली नाही. या बदलामुळे नेटिझन्सना “कपलमध्ये काही बिघडलं आहे का?” असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, या चर्चांवर दोघांनीही अद्याप काहीही अधिकृतपणे सांगितलेले नाही. न सोशल मिडियावर संबंधीत स्टेटमेंट नाही. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांचे लग्नाची बातमी देताना ‘आयुष्यभराचा हमसफर’ असा कॅप्शन दिला होता. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती.मात्र सोशल मिडियावर झालेल्या या बदलामुळे आता त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT