Sumona Chakravarti Saam TV
मनोरंजन बातम्या

The Kapil Sharma Show मधून सुमोना चक्रवर्तीला काढून टाकलं? अभिनेत्रीने स्वत:च सांगितलं सत्य

Sumona Chakravarti on The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अचानक शोमधून गायब झाल्यानंतर सोशल मीडियावर कपिलने तिला शोमधून काढून टाकल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

‘द कपिल शर्मा शो’ मुळे टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिला प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे सुमोनाच्या फॅन्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुमोनाने शो सोडला आहे. मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर सुमोनाला शोमधून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. आता त्या चर्चांवर अखेर सुमोना चक्रवर्तीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल वक्तव्य केलं आहे.

कपिल शर्मा शोबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सुमोनाने ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "ही गोष्ट फारच विचित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल खूप चांगल्या बातम्या छापून आलेल्या होत्या. मी पत्रकाराशी बोलले होते आणि त्याला नेमकं उलटं मी सांगितलं होतं. पण दोन दिवसांनंतर दुसऱ्या मीडिया हाऊसने माझी वेगळीच बातमी छापली होती. त्यावेळी मी काहीच बोलू शकले नाही, कारण तेव्हा मी रोमानियामध्ये होते."

"मी पुन्हा एकदा सांगतेय, मी या शोचा हिस्सा जुलै २०२३ पर्यंतच होते. मी रिझाईन दिलं किंवा मला काढून टाकलं अशातलीही कोणती गोष्ट नाही. जुलैमध्ये शो संपल्यानंतर आम्ही सर्व ज्याच्या त्याच्या कामामुळे वेगवेगळे झालो. मी खतरों के खिलाडी शोमध्ये आहे. कपिल त्याच्या शोमध्ये आहे. कपिलने आणि मी आधी एकत्र काम केल्यामुळे आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही." असं म्हणत सुमोना चक्रवर्तीने सर्व चर्चांना पुर्णविराम दिलेला आहे.

सुमोना येत्या २७ जुलैपासून टेलिकास्ट होणाऱ्या 'खतरों के खिलाडी १४' मध्येही दिसणार आहे. शोच्या शुटिंगवरून अभिनेत्री रोमानियाहून परतली आहे. तिला शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT