shehnaaz gill instagram
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill Video: विमानतळावर शहनाज गिलच्या चाहत्याकडून लिमिट क्रॉस, सोशल मीडियावर युजर्सनी व्यक्त केला संताप

अभिनेत्री शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पंजाबची कतरिना कैफ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलला आता कोणत्याही अन्य ओळखीची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत शहनाजने स्वत:चा ठसा उमटवला आहे. बिग बॉसनंतर (Bigg Boss) प्रकाशझोतात आलेली शहनाज गिल नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री बंगळुरूमध्ये आयोजित साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये रविवारी सहभागी झाली होती. सोमवारी सकाळी शहनाज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दिसली. यावेळी शहनाजसोबत असे काही घडले, जे पाहून लोकांना धक्का बसला.

या व्हिडिओमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) एअरपोर्टमधून बाहेर येताना दिसत आहे. दरम्यान, एक चाहता तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी येतो आणि अचानक तिच्या खांद्यावर हात ठेवू लागतो. मात्र, शहनाज गिल लगेच त्याच्यापासून लांब जाते आणि लांबूनच फोटोसाठी पोझ देते. इतकंच नाही तर मीडियाने विचारल्यानंतर अभिनेत्रीने प्रतिक्रिया सुद्धा दिली. तेव्हा ती म्हणाली, "तुझे क्या लगा तेरा दोस्त है".

हा व्हिडिओ सेलिब्रिटी (Celebrity) फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहनाजचे चाहते त्या व्यक्तीवर संतापले आहेत. एका यूजरने लिहिले आहे- माझ्या बेबीपासून दूर राहा. तर दुसर्‍याने लिहिले - सनापासून दूर राहा.. तर कोणी लिहिले - अरे भाऊ... दुरून. अनेकजण शहनाजची स्तुती करत आहेत. 'शहनाज गिल चांगली आहे', असे कृत्य करूनही फोटो क्लिक केला अशा कमेंट तिचे फॅन्स करत आहेत.

शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिचे किमान 4-5 चित्रपट येणार असल्याचीही बातमी आहे. याचा खुलासा खुद्द शहनाज गिलने केला आहे. एका पापाराझीने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारले होते, तेव्हा शहनाजने उत्तर दिले - कोणता चित्रपट? 4-5 येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, नंतर शारीरिक संबंध; व्हिडिओ काढून धमकी; ३ पानी चिठ्ठी लिहून CAची आत्महत्या

Dombivali : निळजे परिसरात दोन कोटींचे एमडी ड्रग्स जप्त; मानपाडा पोलिसांनी कारवाई, परदेशी ड्रस तस्कराला अटक

Indian Cricketer : भारताचा स्टार क्रिकेटपटू अडचणीत; १० वर्षांचा तुरुंगवास होणार? पीडित तरुणीने भक्कम पुरावा दिला

Lemon Fact: लिंबू उभा का कापू नये? श्रद्धा की अंधश्रद्धा

Dog Health Tips: कुत्रा आजारी पडल्यावर कसे समजते? जाणून घ्या 'हे' संकेत

SCROLL FOR NEXT