Actress Casting Couch Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Casting Couch: मध्यरात्री दिग्दर्शकाने खोलीत घुसून केली अश्लील मागणी; नकार देताच अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकले

Actress Casting Couch: अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कने चित्रपटसृष्टीत आपल्याला सहन कराव्या लागलेल्या छळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. तिने एका दिग्दर्शकाच्या लज्जास्पद वर्तनाचा पर्दाफाश केला.

Shruti Vilas Kadam

Actress Casting Couch: अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संदीपा विर्क गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. ६ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आरोपांमुळे संदीपाला तिहार तुरुंगात चार महिने ठेवण्यात आले होते. नुकतीच तिची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली. एका मुलाखतीत, तिने तुरुंगातील आपल्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

रात्री १२ वाजता दिग्दर्शकाने माझ्या दरवाजा ठोठावला

ज्योत्स्ना बेदी यांच्या पॉडकास्टमध्ये संदीपाने पंजाबी मनोरंजन इंडस्ट्रीची काळी बाजू उघडकीस आणली. तिने स्पष्टपणे सांगितले की, पंजाबी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील प्रकार होतात. तिने एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामध्ये एका दिग्दर्शक मध्यरात्रीच्या वेळी तिच्या खोलीत बळजबरी घुसला. ती म्हणाली, "ज्या चित्रपटात दिलप्रीत ढिल्लन मुख्य अभिनेता होता, त्या चित्रपटासाठी मी सात दिवसाचे शूटिंग केले होते. अमृतसरमधील खालसा कॉलेजमध्ये आमचे शूटिंग पूर्ण झाले होते. शूटिंग संपल्यानंतर, रात्री १२ वाजता त्या दिग्दर्शकाने माझ्या दरवाजा ठोठावला. त्याला पाहताच मी दरवाजा उघडला; कारण, जर एखादा दिग्दर्शक भेटायला आला, तर तुम्ही साहजिकच त्याच्यासाठी दरवाजा उघडता, नाही का?"

मी इथेच झोपणार आहे

"मी त्याला म्हणाले, 'सर, मी झोपले होते,' पण तो थेट आत आला आणि माझ्या बिछान्यावरच जाऊन बसला. तो मला म्हणाला, 'मी इथेच थांबणार आहे. मी इथेच झोपणार आहे. मला कळलं त्याला काय बोलायचं आहे.' मी त्याला सांगितले, 'मी हे करू शकत नाही.' त्यावर त्याने उलट उत्तर दिले, 'तसे असेल, तर मी तुला या चित्रपटातून काढून टाकेन.' त्याला असे वाटले होते की, जर त्याने अशी धमकी दिली, तर मी घाबरेन आणि त्याच्या मागण्या पूर्ण करेन. मला वाटलं तो फक्त धमकी देतोय. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने केवळ एवढीच घोषणा केली की, आज तूझं शूट नाही. मी त्याला उत्तर दिले, 'काहीच हरकत नाही.'

संदीपा पुढे म्हणाली, "जरी मी तो चित्रपट केला असता तरीही तो चित्रपट शेवटी फ्लॉप ठरला असता. कारण, ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत वाईट वर्तन केले आहे, त्या प्रत्येकावर संकट ओढवताना मी पाहिले आहे. त्याच मुलाखतीत, संदीपानं हे देखील उघड केलं की, तिहार तुरुंगात केली जाणारी सुरक्षा तपासणीची प्रक्रिया अत्यंत अपमानजनक असते. ती म्हणाली, "तुरुंगात पाठवण्यापूर्वी, माझी प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी मला एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं." तिथे असलेले तरुण मुलं मला प्रेग्नेंसी टेस्ट करण्यास सांगत होते. माझ्यासाठी ती अत्यंत लज्जास्पद बाब होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलांच्या टिफिनची झंझट मिटली! अवघ्या 5 मिनिटांत बनवा 'हे' 5 चविष्ट पदार्थ

Beed Boat Accident: अधिकमासात गोदावरीत ३५ भाविकांची बोट उलटली, एका महिलेचा मृत्यू, नदीपात्रात एकच खळबळ

Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Maharashtra News Live Update: आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट

SCROLL FOR NEXT