Sai Tamhankar And Sonalee Kulkarni News Instagram
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar In Khupte Tithe Gupte: काय सांगता?, सईने सोनालीला आणि तिच्या पतीला ठेवलं होतं उपाशी?; खुलासा करत म्हणाली...

Khupte Tithe Gupte Latest Episode Teaser: सईने ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने एकदा सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं कबूल केलंय.

Chetan Bodke

Sai Tamhankar And Sonalee Kulkarni News

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅशनकरीता चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या फॅशन करीता आणि उत्तम अभिनयाकरीता प्रसिध्द असलेल्या सईने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अभिनेत्रीने हजेरी लावणार आहे. सईचे मराठी सिनेसृष्टीत अनेक मित्र मंडळी आहेत. त्यातीलच तिची एक मैत्रीण म्हणजे, सोनाली कुलकर्णी... सईने ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने एकदा सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं कबूल केलंय.

अवधूत गुप्ते होस्ट करत असलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये आतापर्यंत राज्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. येत्या रविवारच्या एपिसोडमध्ये सई ताम्हणकरने हजेरी लावली आहे. सध्या सईच्या आगामी एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत सईने कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून उपस्थिती लावली असून तिने त्या व्हिडीओत सोनाली कुलकर्णीला आणि तिच्या पतीला का उपाशी ठेवलं? याचं कारण सांगितलं.

यावेळी कार्यक्रमात अवधूतच्या सर्वच प्रश्नांवर सईने दिलखुलास, बिनधास्त आणि बेधडक उत्तर दिले आहेत. मुलाखती दरम्यान अवधुतने सईला “तू लोकांना घरी जेवायला बोलवते आणि तासंतास उपाशी ठेवतेस हे खरं आहे का?” असा प्रश्न विचारला.

यावर सई म्हणते, “मी सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल बेनोडेकरचं लग्न झाल्यावर मी त्यांना माझ्या घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही त्यावेळी माझ्या घरी खूप टाईमपास करत होतो, धम्माल मस्ती करत मॅच बघत होतो. आमचा बोलण्यामध्ये आणि टाईमपास करण्यामध्ये इतका वेळ गेला, त्यात आम्ही इतके गुंतलो की, त्यांना दुपारचं जेवण नं देता, डायरेक्ट रात्रीचंच जेवण दिलं. मी त्यांच्यासाठी दुपारचे जेवण बनवणार होते पण आम्ही जास्त टाईमपास केल्यामुळे तो डिनर झाला.”

सईचं हे मिश्किल उत्तर ऐकून अनेकांना हसू आवरत नसून सर्वांनाच या एपिसोडची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सई या आगामी भागात कोण कोणते किस्से उलगडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT