Poonam Pandey On Leaked Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey News : पूनम पांडेचा प्रायव्हेट व्हिडीओ कोणी व्हायरल केला?, अभिनेत्रीने सांगितला घडलेला सर्व किस्सा

Poonam Pandey On Leaked Video : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा सोशल मीडियावर प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाला होता, तो व्हिडीओ कोणी व्हायरल केला याचा खुलासा तिने केला.

Chetan Bodke

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वत:च्याच निधनाची खोटी माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यापूर्वी तिचा प्रायव्हेट व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून अभिनेत्री कमालीची प्रकाशझोतात राहिली. तिच्या त्या व्हिडीओची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा झाली होती. नुकतंच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे, मुलाखतीत तिचा तो प्रायव्हेट व्हिडीओ एक्स बॉयफ्रेंडनेच व्हायरल केल्याचे सांगितले.

एका मुलाखतीत पूनम पांडेने सांगितले की, "माझा प्रायव्हेट व्हिडीओ एक्स बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आजही ती घटना मी विसरलेली नाही. त्या घटनेतून मी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याने माझे केसं कापण्यासाठी हातात ट्रीमर मशीन घेतली, त्याला माझे केस कापायचे होते. मी कशी तरी त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या घरी आले. त्यातच मी तिथे माझा फोनही विसरले होते. घरी आल्यानंतर वडिलांनी मला रडताना पाहिलं. त्यामुळे त्यांना सर्व घडलेला प्रकार मी सांगितला."

मुलाखतीत पूनमने पुढे सांगितले की, "त्यानंतर वडिलांनी त्या माणसाला फोन केला. (अभिनेत्रीने त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाही) तु काय करतोय माझ्या मुलीसोबत ? असा प्रश्न वडिलांनी त्या माणसाला विचारला. सोबतच त्याने जर का मी त्याकडे परत गेली नाही तर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्याला पुन्हा मी तुझ्याकडे येणार नाही, थेट असंच उत्तर दिलं होतं. पण तो माझ्यासोबत अशा पद्धतीने वागेल, याचा मला विश्वास बसत नाही. इतक्या वाईट पातळीवर तो जाईल असं मला वाटलं नव्हतं."

"माझा तो प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी खूप चिंतेत होते. मी जरीही संकटांना तोंड देत असले तरीही माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे मित्र त्याचे कौतुक करीत होते. त्याने केलेल्या कामाचे त्याचे मित्र त्याचं कौतुक करत होते. "तु तर रॉकस्टार आहेस बॉस", "तु तर हिरो झालास मित्रा" अशा प्रतिक्रिया त्याला त्याचे मित्र देत होते. पुनम पांडेच्या कामाबद्दल सांगायचे तर, 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'लव्ह इन अ टॅक्सी' सारख्या चित्रपटांमुळे ती चर्चेत आली आहे. त्यासोबतच कंगनाच्या 'लॉकअप' या रिॲलिटी शोमध्ये ही ती दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT