Pooja Sawant Interview Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Shared Wedding Plan: ‘रिती रिवाजाप्रमाणेच सर्व करणार...’; पूजा सावंतने चाहत्यांना सांगितला लग्नाचा प्लॅन

Pooja Sawant News: चाहत्यांना उत्सुकता आहे, पूजा सावंतच्या लग्नाची. नुकतंच एका मुलाखतीमध्ये, पूजाने तिच्या लग्नाचा प्लॅन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Pooja Sawant Shared Wedding Plan

सध्या मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लव्हलाईफमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पूजाने तिच्या लव्हलाईफचा खुलासा केला. सिद्धेशची आणि तिची भेट कशी झाली? याबद्दल तिने सांगितले. सध्या चाहत्यांना उत्सुकता आहे, तिच्या लग्नाची. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, पूजाने तिच्या लग्नाचा प्लॅन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

पूजाने गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आणि नंतर मिस्ट्री मॅनच्या नावाचा खुलासा केला. पूजा मुलाखतीमध्ये म्हणाली, “माझे लहानपणापासून लग्नाबद्दल खूप प्लॅन्स आहेत. माझ्या मनामध्ये लग्नामध्ये पर्पल रंगाची साडी परिधान करावी अशी खूप इच्छा होती. मात्र, आपल्या मराठी लोकांमध्ये, लग्नाच्यावेळी पिवळ्या रंगाची साडी परिधान करतात. पण मला त्यासाठी कोणीही मान्यता देत नाही.” (Marathi Actress)

“शेवटी मी आपल्या रिती रिवाजाप्रमाणेच सर्व करणार आहे. माझे आई- बाबा सुद्धा मला रिती रिवाजाप्रमाणेच लग्न करण्यासाठी सांगत आहेत. आई- बाबा लग्नाचा प्लॅन करत आहेत, पण सिद्धेशच्या आवड- निवडीकडेही पाहायला हवं. सिद्धेशची कोणत्या गोष्टीसाठी काही हरकत नसते. त्याच्या आधीच माझे सर्व प्लॅन्स रेडी असतात. कुठे फिरायला जायचे असेल तर पहिला प्लॅन माझा असतो. त्यामध्ये त्याची कोणतीही हरकत नसते.” (Social Media)

“सध्या डेस्टिनेशन वेडिंगचं लोकांमध्ये खूप फॅड आहे. लोकं खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात. मला डेस्टिनेशन वेडिंग झालं तरी काही हरकत नाही. पण मला माझं डेस्टिनेशन वेडिंग मुंबईमध्येच करायचे आहे. जिथे माझा जन्म झालाय, माझी जवळची माणसं वेळेत पोहोचतील, अशा ठिकाणीच माझं लग्न व्हावं. पण सध्या लग्नाच्या जागेचं काही ठरलेलं नाही.” असं पूजा सावंतने मुलाखतीमध्ये सांगितलं. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT