Lava Phone Charging La Lavani Released Instagram
मनोरंजन बातम्या

Mansi Naik Video: मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’, अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधले लक्ष

Mansi Naik News: कायमच आपल्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Lava Phone Charging La Lavani Released

कायमच आपल्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी मानसी नाईक सध्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. मानसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळे तर कधीकधी आपल्या रिल्समुळे सुद्धा ती चर्चेत असते. मानसी अनेक दिवसांनंतर एका नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच मानसीची ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी सोशल मीडियावर रिलीज झाली आहे.

मानसी नाईक नेहमीच आपल्या ठसकेबाज लावणीमुळे आणि हटक्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. सध्या मानसी नाईक ‘लावा फोन चार्जिंगला’ या लावणीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. तिच्या ह्या नखरेल लावणीला गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तर महाराष्ट्राची लाडकी मेनका आणि अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्य आणि नखरेल अदाकारीने लावणीला चारचांद लावले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून 'रॉकस्टार' अवधूत गुप्तेंचे शब्द आणि स्वररचना आहे. या सर्वांच्या कलेने ही 'लावण्यवती' बहरली आहे.

एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील 'गणराया' आणि 'करा ऊस मोठा' या दोन गाण्यांनंतर आता 'लावा फोन चार्जिंगला' ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गाण्याबद्दल दिग्दर्शक अवधूत गुप्तेने सांगितले की, “ ‘लावण्यवती’तील पहिल्या दोन लावण्या संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरल्या. आता ही तिसरी बहारदार लावणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मानसी नाईकने आपल्या नजाकतीने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. आता या लावणीने तिच्या चाहत्यांमध्ये अधिकच भर पडणार आहे. खूप धमाकेदार अशी ही लावणी आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT