Swara Bhasker Reaction On Kangana Ranaut Slapped Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Slapped Row : "किमान ती जिवंत आहे अन्यथा..." स्वरा भास्करने कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर सोडलं मौन

Swara Bhasker Reaction On Kangana Ranaut Slapped : अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांना चंदीगड विमानतळावर एका महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात दिली. घटनेनंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय क्षेत्रातही उमटले होते.

Chetan Bodke

मंडी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना चंदीगड विमानतळावर (Chandigadh Aiport) एका महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात दिली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय क्षेत्रातही उमटले.

महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौर हिला (Kulvinder Kaur) निलंबित करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी राग व्यक्त केला असून या प्रकरणाचे काहींनी समर्थनही केले आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा भास्करने दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतच्या थप्पड प्रकरणावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, " कोणतीही समजुतदार व्यक्ती हेच म्हणेल की, कंगनासोबत घडलेला प्रकार चुकीचा होता. असा कोणीही नसेल जो या घटनेचे समर्थन करेल. तर हो, तिच्यासोबत जे काही घडलं ते चुकीचं होतं आणि ते घडायला नको होतं. एखाद्यावर हल्ला करणे चुकीचं आहे. कंगनाच्या कानाखालीच मारली आहे, पण तरीही हा प्रकार घडायला नको होता. ती सुरक्षित आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. शिवाय कंगनाच्या आजुबाजुला सुरक्षाही आहे."

"आपल्या देशात हत्येमुळे अनेकांचा जीव गेला आहे. देशात मॉब लिचिंगमध्ये अनेकांची हत्या करण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षकांनी काही लोकांना मारहाण करत असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाले आहेत. या गोष्टीचं जे समर्थन करतात, त्यांनी कंगना प्रकरणावर आम्हाला शिकवण्याची गरज नाही." असं स्वरा भास्कर व्हिडीओमध्ये म्हणाली आहे. स्वरा भास्करने 'तनु वेड्स मनू'मध्ये कंगना रणौतसोबत काम केले आहे. यानंतर ती कंगनासोबत 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'मध्येही दिसली होती.

कंगना रनौतला कानशिलात देणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरविरोधात घटनेनंतर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी कंगना रनौतने "दिल्लीत शेतकरी 100-200 रुपये घेऊन आंदोलनाला बसले आहेत." असं वक्तव्य केलं होतं. या आंदोलनात कुलविंदर कौरचीही आई होती. म्हणून कुलविंदरच्या मनात कंगनाच्या या वक्तव्याचा संताप होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT