बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचं ८९ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत सर्वांनाच धक्का बसला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जवळजवळ तीन दिवसांनंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने फोटो त्यांनी शेअर केले आहेत. अभिनेत्रीनं धर्मेंद्र हे त्यांच्यासाठी सर्वकाही होते, असं म्हणत धर्मेंद्र यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.
हेमा मालिनी यांची पोस्ट व्हायरल
हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'धरमजी.. तुम्ही माझ्यासाठी खूप काही होता. एक प्रेमळ पती. आमच्या दोन मुलीचे वडील. एक मित्र, एक तत्वज्ञानी, एक मार्गदर्शक आहे. ते माझ्यासाठी सर्वकाही होते. आम्ही चांगल्या आणि वाईट काळातून गेलो आहे. त्यांनी साधी राहणीमानातून आणि मैत्रीपूर्ण वागणुकीतून माझ्या कुटुंबातील प्रत्येकाची मने जिंकली. त्यांनी सर्वांना प्रेम दिले. पब्लिक पर्सनॅलिटी व्यतिरिक्त, त्यांचं टॅलेंट, दयाळुपणा, त्यांना इतर लेजेंड्सपेक्षा वेगळे युनीक आयकॉन बनवले'.
'चित्रपटसृष्टीतील त्यांचे यश आणि प्रसिद्धी कायम राहिल. मी माझे दु:ख व्यक्त करू शकत नाही. धर्मेंद्र यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एका पोकळी निर्माण झाली आहे. जे कधीही भरून निघणार नाही. इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतर, आता मला फक्त आठवणींसोबत जगावे लागत आहे'. हेमा मालिनी यांनी पोस्टमधून आपल्या भावनांना मोकळं केलं.
या भावनिक पोस्टसोबत, हेमा मालिनी यांनी अभिनेत्यासोबतचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी संपूर्ण फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भावनिक कमेंट करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.