Hansika Motwani Instagram @ihansika
मनोरंजन बातम्या

Hansika Motwani: हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार, जयपूरच्या 450 वर्ष जुन्या महालात पार पडणार सोहळा

टीव्ही मालिका आणि साऊथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकणार लग्नबंधनात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: टीव्ही मालिका (Program) आणि साऊथ सिनेमांमध्ये (Movie) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याविषयीची एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हंसिका मोटवानी या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार आहे. ती डिसेंबरमध्ये जयपूरच्या 450 वर्ष जुन्या किल्ल्यात लग्न करणार आहे, ज्याची तयारी हंसिका मोटवानीने सुरू केली आहे.

सध्या अभिनेत्री तिच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त आहे. जयपूर येथील मुंडोटा किल्ल्यावर शाही पद्धतीने तिचे लग्न पार पडणार आहे. तिच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. मात्र, हंसिका मोटवानी (Hansika Motwani) कोणाबरोबर लग्न करणार आहे, याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. अभिनेत्रीकडून लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हंसिका मोटवानीने बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'शाका लाका बूम बूम', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यासह इतर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. हंसिका मोटवानीने हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटात बाल कलाकार म्हणूनही काम केले आहे. याशिवाय 'आपका सुरुर' आणि 'मनी है तो हनी है' या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. हंसिका मोटवानी दक्षिण चित्रपटसृष्टीत सुद्धा काम केले आहे. तिने दक्षिणेतील अनेक बड्या कलाकारांसोबत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : भगवान गणेशाची कृपा होणार, गुप्तधनाचे मार्ग सापडतील; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार, वाचा

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

SCROLL FOR NEXT