कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची घटनेनंतर आणखी एक घटना
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा
रोहित गोदारा आणि गोल्डी बरार गँगने गोळीबार केल्याचा दावा
Disha Patani House Firing Case : काही दिवसांपूर्वी कपिल शर्मांच्या कॅफेवर गोळीबार झाला होता. कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबाराची घटना ताजी असताना प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दिशाच्या घरावर गोळीबार केल्याची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी बरार गँगने घेतली आहे.
काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सलमान खान, कपिल शर्मा यांच्यानंतर अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार झाल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या गोळीबारानंतर कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्हायरल पोस्टमध्ये आरोप करण्यात आला आहे की, संत प्रेमानंद महाराज यांचा अनादर केल्याने गोळीबार केला. मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन(भाई), खुशबू पटानी, दिशा पटानीच्या (व्हिला नंबर ४०, सिव्हिल लाइन्स, बरेली, उत्तर प्रदेश) घरावर गोळीबार करण्यात आला आहे. आम्हीच तो गोळीबार केला आहे'.
'त्यांनी पूज्य संत (प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज) यांचा अपमान केला आहे. त्यांनी सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करू शकत नाही. हा फक्त ट्रेलर आहे. दुसऱ्यांदा त्यांच्या घरातील कोणी धर्माचा अनादर केला, तर घरातील कोणीही जिवंत वाचणार नाही. हा संदेश केवळ त्यांचासाठी नसून सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी आहे, असेही पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.
टीप - दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी बरारने केलाय. साम टीव्ही या घटनेला दुजोरा देत नाही. सोशल मीडियाच्या व्हायरल पोस्टच्या आधारे बातमी लिहिण्यात आली आहे. या प्रकरणात कोणीही अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.