Bela Bose Died  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bela Bose Passed Away: सिनेसृष्टीवर शोककळा! 'जय संतोषी माँ' फेम अभिनेत्रीचे निधन

२००हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या बेला बोस यांचे निधन

Saam Tv

Actress Bela Bose Passed Away: चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. काल २० फेब्रुवारी रोजी बेला बोस यांनी सेहवातच आश्वास घेतला.

बेला बोस यांच्या जाण्याने सर्व चित्रपट सृष्टीवर शोक पसरला आहे. अचानक झालेल्या बेला यांच्या मृत्युने सगळेच दुःखी आहेत.

बेला बोस यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये कामी केले आहे. १९७५ चित्रपट 'जय संतोषी माँ'साठी त्या ओळखल्या जातात. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

बेला बोस यांचा जन्म कोलकाता येथे झाला होता. पण त्यांचे कुटुंबीय काही कारणास्तव मुंबईमध्ये शिफ्ट झाले होते. बेला या अभिनयासह नृत्यातही पारंगत होत्या. त्यांनी शास्त्रीय मणिपुरी नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते.

१९६२ साली बेला यांनी गुरु दत्त यांच्या 'सौतेला भाई' या चित्रपटामधून लीड अभिनेत्री म्ह्णून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी हिंदी आणि त्यांच्या रिजनल भाषेसह २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम आहे. चित्रपटांसह बेला यांनो बंगाली नाटकांमध्येही काम केले आहे.

१९६७मध्ये त्यांचे लग्न अभिनेते अशीश कुमार यांच्याशी झाले. लग्नानंतर त्या हळुहळू चित्रपटांपासून दूर झाल्या. अभिनय आणि डान्सशिवाय त्यांना कविता करण्याची देखील आवड होती. तसेच त्या पेंटिंग देखील करायच्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT