अभिनेत्री आणि बिझनेस वुमन अशी ओळख अभिनेत्री प्राजक्ता माळीची ओळख सर्वत्र आहे. प्राजक्ताने २०२२ मध्ये, 'प्राजक्तराज' नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच करत बिझनेस क्षेत्रात पाऊल टाकले. तिच्या आधुनिक पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते. आता त्यानंतर अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्ताच्या 'फुलवंती' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरूवात झाली होती. आता तिच्या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं असून प्राजक्ता माळीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिलेय की, “ज्या क्षणाची मी गेलं पुर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते; तो क्षण आला. 'फुलवंती' चित्रपटाची शुटिंग संपली आहे. ‘निर्माती’ आणि ‘एक्झिक्युटर’ म्हणून ‘फुलवंती’ चित्रपटाचे दुसरं आणि फायनल शुटिंग काल पूर्ण झाले. “शिवोहम क्रिएशन्स”चा पहिला प्रकल्प. “फुलवंती” माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष दिले आहे. शिवाय, माझ्या आयुष्यामध्ये या चित्रपटाने खूप काही शिकवलं आहे.”
प्राजक्ताने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “जे माझ्या पाठीशी उभे राहिले, पाठिंबा दिला आणि मदत केली त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केले आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. शेवटी माझी सगळी कामं झालीच. या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. त्याचप्रमाणे मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, आपण जे साध्य करु शकलो ते मानवी दृष्ट्या शक्य नाही. पण एका शक्तिशाली उर्जेने आम्हाला हे प्रोजेक्ट सुरु ठेवण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद दिली.”
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताने या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केली आहे. स्नेहल तरडेने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करते. पनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर निर्मिती प्राजक्ता माळी करणार आहे. मराठी साहित्यिक आणि नाटककार बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाची घोषणा प्राजक्ताने २०२१ मध्ये केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.